• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 8, 2026
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

पाचोरा, 8 जुलै: पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) टप्पा १ व टप्पा २ अंतर्गत मंजूर झालेल्या तसेच अपूर्ण अवस्थेतील घरकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सक्रिय भूमिका घ्यावी. लाभार्थ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांना घरकुलांचे बांधकाम सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करावे. या कामात दिरंगाई, टाळाटाळ अथवा दुर्लक्ष करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी दिला.

सीईओंकडून घरकुल योजनेबाबत आढावा –

बुधवार (दि. ८ जुलै) रोजी पाचोरा पंचायत समितीच्या सभागृहात पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, गटविकास अधिकारी एस. एस. मुंडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पाचोरा तालुक्यातील गावनिहाय मंजूर, पूर्ण व अपूर्ण घरकुलांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पहिला व दुसरा हप्ता वितरित होऊनही अद्याप पूर्ण न झालेल्या घरकुलांची कारणमीमांसा करण्यात आली. तसेच घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देऊनही अतिक्रमण, स्थानिक अडचणी अथवा इतर कारणांमुळे रखडलेल्या प्रकरणांचाही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्वतः आढावा घेतला.

यावेळी त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना प्रत्येक प्रकरणावर वैयक्तिक लक्ष केंद्रित करून लाभार्थ्यांशी समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून अडथळे दूर करून घरकुलांची कामे तातडीने सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.

…तर संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई! –

घरकुलांच्या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई किंवा निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही. प्रगतीबाबत नियमित आढावा घेण्यात येणार असून कामात हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर थेट प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: VIDEO | ‘रील्स’च्या नावाखाली स्टंटबाजी करणाऱ्यांवर जळगाव पोलिसांची कारवाई; मुख्यालयात बोलावून दिला कायद्याचा धडा

बातमी शेअर करा !
Share
Tags: gharkul schemejalgaon zp ceo karishma nairpachora taluka latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी देऊन विकासाला गती द्यावी — पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page