एरंडोल (जळगाव) : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील खून आणि आत्महत्येप्रकरणी सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘हितेशच्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. तसेच भवरखेडा गावापासून थोड्या अंतरावरील धरणात त्याला बुजून आलो आहे. किती दिवस मुलाच्या हातून मार खाऊ’, अशी हतबलता रिल्स स्टार हितेश पाटील याचे वडील विठ्ठल पाटील यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मांडली होती.
रिल्स स्टार हितेश पाटील हा सोशल मीडियावर प्रसिद्ध होता. मात्र, त्याला दारुचे व्यसन होते. तसेच त्यातूनच तो माजी सैनिक असलेले आपल्या वडिलांना मारहाण करायचा. मुलाच्या या मारहाणीला कंटाळून माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी मुलगा हितेश याचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर भवरखेडा गावापासून दोन ते अडीच कि.मी. अंतरावरील पाझर तलाव परिसरात त्याचा मृतदेह पुरला. इतकेच नव्हे तर यानंतर स्वतः विठ्ठल पाटील यांनीही घरात आत्महत्या केली.
तिघांना पोलीस कोठडी –
दरम्यान, एरंडोल येथील हितेश पाटील याच्या खूनप्रकरणी त्याचे वडील माजी सैनिक विठ्ठल सखाराम पाटील (50) यांना खूनात मदत केल्याच्या संशयावरून त्यांचे बंधू नामदेव सखाराम पाटील (वय-55), त्याचा मुलगा भालचंद्र नामदेव पाटील (वय-28) आणि जेसीबी चालक रवींद्र सुरेश पाटील (वय-24) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सुसाईड नोटमध्ये काय? –
दरम्यान, विठ्ठल पाटील यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली. त्यात हितेश हा दारू पिऊन आपणास मारहाण करत होता. त्यास कंटाळून भवरखेडा गावानजीकच्या एका नाल्याजवळ त्याचा खून केला व मृतदेह जमिनीत पुरला आहे, किती दिवस मुलाच्या हातून मार खाऊ’, अशी हतबलता विठ्ठल पाटील यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये मांडली होती.
हेही वाचा – minister sanjay savkare : ‘त्या’ वक्तव्यावरुन मंत्री संजय सावकारेंनी मागितली माफी, म्हणाले…