नवी दिल्ली, 5 मार्च : मागील एक ते दीड तासांपासून फेसबुक आणि इन्स्टाग्राम (Instagram) पूर्णपणे डाऊन झाले आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांचे अकाऊंट लॉगआऊट झाले असून त्यांना लॉग इन करताना अडचणी येत आहेत.
वापरकर्त्यांना अशाप्रकाराच्या अडचणी येत असताना देखील फेसबुक किंवा इन्स्टाग्रामकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेले नाही. दरम्यान, सातत्याने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय राहणाऱ्या नेटकऱ्यांची चांगलीच गैरसोय झाल्याची दिसून येत आहे. फेसबुक वापरता येत नसल्यामुळे नेटकरी अस्वस्थ झाल्याचे समोर येत आहे.
फेसबुक डाऊन कशामुळे?
सायबर तज्ज्ञांनी यावर मत व्यक्त केले आहे, हा DOS हल्लाही असू शकतो, अस त्यांनी म्हटले आहे. DOS अॅटॅकमुळेच फेसबुक डाऊन झाले असल्याचे गृहीत धरले जात असून अशावेळी रेच लोक एकाच वेळी सर्व्हरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात. जे क्षमतेपेक्षा जास्त असते आणि यामध्ये अनेक फेक अकाऊंटचा समावेश असू शकतो.