चाळीसगाव, 27 फेब्रुवारी : चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांनी विविध मागण्या पूर्ण होण्यासाठी चाळीसगाव तहसीलदार यांना आज (27 फेब्रुवारी) निवेदन दिले. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा शिरसगाव येथील शेतमजूर दिलीप फकीरा पाटील यांनी दिला आहे.
निवेदनात म्हटल्यानुसार, चाळीसगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन सुद्धा शेतकऱ्यांना दुष्काळाच्या कवडीमोल फायदा झालेला नाही. मन्याड धरणाचे पाण्यावर शेतकरी यांचा उपजीविकेचा प्रश्न आहे. या पार्श्वभूमीवर मन्याड धरण परिसरातील शेतकऱ्यांतर्फे खालील मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, या मागण्या 6 मार्च 2024 पर्यंत पूर्ण न झाल्यास शिरसगाव येथील दिलीप फकीरा पाटील यांनी 7 मार्च 2024 रोजी पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
मन्याड धरण परिसराततील शेतकरी यांच्या मुख्य मागण्या खालीलप्रमाणे –
- गिरणा मन्याड नदी जोड प्रकल्प करून मन्याड धरणात पाणी टाकणे.
- गिरणा धरण पावसाळ्यात फुल झाल्यावर ओव्हर फ्लो होणारे पाणी मण्याड धरणात टाकणे.
- मन्याड धरणाची उंची वाढवणे.
- कॅनॉलची दुरुस्ती करणे.
- शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 12 तास वीज पुरवठा मिळणे.
निवेदनावर दिलीप पाटील, खुशाल बिडे (जळगाव जिल्हा संपर्क मराठा महासंघ ), चंद्रकांत पाटील, धर्मा बाप्पू काळे, जयेश पाटील, साहेबराव चव्हाण, भूषण पाटील, गुलाब चव्हाण, आनंदा चव्हाण, रवींद्र पाटील, आशिष सानप, जयदीप पवार, संजय पाटील, दिनकर पाटील, सागर पाटील, देवचंद पाटील, सुवर्णसिंग पाटील, रावण पाटील, खुशाल पाटील, रमेश पाटील, विकास पाटील, पिराजी गायकवाड, लहू बिलोरे, सफिक शेख, रविंद्र पाटील, आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
हेही वाचा : शेतकऱ्यांचे अवकाळीने पावसाने नुकसान, पारोळा तालुक्यातील मोंढाळे येथे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी