पाचोरा, 7 जानेवारी : मराठी पत्रकारितेचे जनक, आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1812 साली दर्पण वृत्तपत्राची सुरूवात केली होती. यानिमित्त दरवर्षी 6 जानेवारी हा पत्रकार दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनच्यावतीने पत्रकार दिनानिमित्त 6 जानेवारी रोजी दुपारी पत्रकारांचा सन्मान सोहळा पार पडला.
पोलिसांकडून पत्रकारांचा सन्मान –
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा तसेच पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्या माध्यमातून पत्रकार सन्मान सोहळा 6 जानेवारी पार पडला. यानिमित्त पिंपळगाव हरेश्वर परीसरातील सर्व पत्रकार बंधुंना आमंत्रित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एपीआय कल्याणी वर्मा तर प्रमुख उपस्थिती म्हणून पीएसआय विठ्ठल पवार उपस्थित होते.
सर्वप्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक किशोर लोहार यांनी केले. सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी पत्रकारांना अनमोल मार्गदर्शन केले. यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या सन्मानाबद्दल पत्रकारांनी आभार मानले. या कार्यक्रमात पत्रकारांना उपयुक्त साहित्य, वही आणि पेन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती –
यावेळी किशोर लोहार, रविशंकर पांडे, दिलीप जैन, हेमशकर तिवारी, सुनील लोहार, गजानन लाधे, चंद्रकांत माहोर, भिकन पाटील, राजू ठाकूर, दीपक मुलमुले, ईसा तडवी, विजय राजपूत, रोषन जैन विनोद काटे, सतिष गोपाळ, विजय राजपुत, भाजप आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील, पोलीस हवालदार अरुण राजपूत, अभिजीत निकम, आदी उपस्थित होते.






