चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी
जळगाव – महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक येत्या 20 नोव्हेंबरला होत असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी आता प्रचाराचा आज शेवटचा दिसून असून प्रचाराला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. 5 नोव्हेंबरपासून राजकीय प्रचाराचा धुरळा उडाला होता. यानंतर आज सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.
15 ऑक्टोबर रोजी निवडणुकीची घोषणा –
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा ही 15 ऑक्टोर रोजी केली त्यानंतर सर्व राजकीय पक्ष हे जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा करण्यात गुंतले होते. यामध्ये 22 ते 29 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याची मदत होती. यानंतर 4 नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता. त्यानंतर खऱ्या अर्थाने राज्यात प्रचाराला जोरदार सुरुवात झाली.
सर्वच पक्षांच्या वतीने रोडशो, जाहीर सभा –
राज्यातील निवडणुकीच्या प्रचारात अनेक प्रमुख नेत्यांचे रो़ड शो झाले. तसेच जाहीर सभाही झाल्या. या सर्व कालावधीत प्रचार आणि रोड शो यांनी राज्यातील निवडणूक रण ढवळून निघाले होते. यामुळे आता प्रचाराच्या तोफा थंडावल्यावर आता उमेदवार तसेच मतदारांना मतदानाची प्रतीक्षा जनतेला राहणार आहे.
दिग्गजांच्या झाल्या महाराष्ट्रात सभा –
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शिंदेसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत, अजित पवार गटाच्या वतीने पक्षाचे प्रमुख अजित पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, शरद पवार गटाच्या वतीने पक्षाचे प्रमुख शरद पवार, कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेसच्या वतीने मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, हिमाचल प्रदेश, तेलंगणाचे मुख्यमंत्री, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, ठाकरेसेनेच्या वतीने पक्षमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या जाहीर सभा झाल्या.
जळगाव जिल्ह्यातील परिस्थिती कशी –
जळगा जिल्ह्यातील 11 विधानसभा निवडणुकांमध्ये कुठे तिरंगी, तर कुठे चौरंगी लढत दिसत आहे. सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचारामध्ये चांगलीच चुरस दिसून आली. यामध्ये उमेदवारांनी सुपरसंडे आणि लग्नांचा मुहूर्त साधून जोरदार प्रचार केला. यंदाच्या निवडणुकीत जातीय समीकरणांमुळे मतविभाजन होण्याची शक्यता आहे. तसेच जळगाव शहर, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, रावेर, या मतदारसंघांमध्ये बंडखोरांनीही आव्हान उभे केले आहे. त्यामुळे या वेळी नेमकं कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पाहा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ : कोण होणार आमदार? कजगाव येथील जनतेशी थेट संवाद