धुळे, 10 एप्रिल : समता शिक्षण संस्था, पुणे संचलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी क्षेत्रकार्याच्या शेवटच्या फिल्ड वर्क असून त्या निमित्त क्षेत्रकार्य समारोप कार्यक्रम आयोजित केला होता.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शाळा नकाणे या शाळेचे मुख्यध्यापक सुनील शिंदे यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले. प्रमुख पाहुणे समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील क्षेत्रकार्य मार्गदर्शक प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर हे उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक कर्मचारी देखील उपस्थित होते. तसेच एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षातील विद्यार्थी सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व जिल्हा परिषद शाळा नकाणे येथील शिक्षक कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता.
शाळेतील सर्व शिक्षकांचे गुलाबाचे फुल, पेन, रुमाल देऊन सत्कार करण्यात आला होता. तसेच केस वर्क, ग्रुप वर्क साठी निवडलेले विद्यार्थ्यांचे वही पेन, गुलाबाचे फुल देऊन सत्कार केला. आणि विद्यार्थ्यांचे आई, वडील, आजी यांचे देखील सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रकाश नाईक यांनी विद्यार्थ्यांना आपले जिल्हा परिषद शाळा नकाणे येथील शिक्षण विषयी काय काय शिकायला मिळाले, त्या बदल थोडक्यात मार्गदर्शन केले. त्यानंतर अध्यक्ष समारोप भाषण मुख्यध्यापक सुनील शिंदे यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी, एम. एस. डब्ल्यू. प्रथम वर्षाचे विद्यार्थी, गावातील महिला उपस्थित होत्या.
हेही वाचा : Success Story : सलग 4 वेळा अपयश, पण चोपड्याच्या वैभवीनं करुन दाखवलं! शेवटी सरकारी अधिकारी झालीच!