मुंबई, 28 जून : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज राज्याचे अर्थमंत्री अजित पवार सरकारकडून अर्थसंकल्प सादर करतील. यामध्ये युवक-महिला तसेच शेतकऱ्यांसदर्भात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी अर्थमंत्री अजित पवार हा राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर हा अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याने यामध्ये मोठ्या योजनांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
‘या’ योजनांची घोषणा होण्याची शक्यता? –
राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण, युवा कौशल्य, अन्नपूर्णा योजना अशा महत्वाच्या योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे. अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सर्व महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत मिळणार आहेत. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांना आर्थिक निकषानुसार 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची मिळणार भरपाई, मदतीसाठी अनुदान मंजुर