• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

गुलाबराव पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच; उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील 16 भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा विशेष पाठपुरावा

जळगाव जिल्ह्यातील सर्व भाविक सुरक्षित

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 7, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
गुलाबराव पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच; उतराखंडमध्ये अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील 16 भाविकांसाठी पालकमंत्र्यांचा विशेष पाठपुरावा

जळगाव, 7 ऑगस्ट : उतराखंडमधील अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे अडकलेल्या जळगाव जिल्ह्यातील भाविकांना सुखरूप दिल्लीमार्गे जळगावला परत आणण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेऊन तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची दिल्लीत बैठक –

या बैठकीस स्मिता शेलार, आशुतोष दिवेदी (सहाय्यक निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन) तसेच प्रमोद कोलपते (व्यवस्थापक, महाराष्ट्र सदन) हे उपस्थित होते. बैठकीत भाविकांच्या मदतीसाठी राज्य सरकारच्या विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी पालकमंत्री पाटील यांनी उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे खासगी सचिव हिमांशू यांच्याशी थेट संवाद साधून भाविकांना शक्य तितक्या लवकर दिल्लीपर्यंत आणण्याची विनंती केली. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत हिमांशू यांनी भाविकांच्या सुरक्षिततेबाबत पूर्ण सहकार्य आणि लवकरात लवकर दिल्लीमार्गे सुटकेची व्यवस्था केली जाईल, असे आश्वस्त केले. यावेळी उतराखंडचे पोलीस उपमहानिरीक्षक निलेश भरणे यांच्याशी पालकमंत्री यांचे बोलणे झाले.


गुलाबराव पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच –

पालकमंत्री गुलाबराव पाटील हे कालपासून दिल्लीमध्येच तळ ठोकून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहेत. त्यांनी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी नियमित संपर्क ठेवून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग, रेल्वे प्रशासन व इतर यंत्रणांशी समन्वय सुरु केला आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. धरणगाव) येथील 13 तरुण आणि जळगाव येथील एका कुटुंबातील 3 व्यक्ती सध्या उतराखंडमधील हर्षिलजवळील भगिरथी होमस्टे, बागोरी येथे अडकले आहेत.

दरम्यान, सरकार आपल्यासोबत आहे. सर्व यंत्रणा कार्यरत असून भाविकांना सुखरूप परत आणले जाईल, असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उतराखंडमध्ये अडकलेल्या भाविकांच्या जळगावमधील नातेवाईकांना धीर देताना सांगितले.

अडकलेल्या भाविकांची नावे पुढीलप्रमाणे:

रोहन दिनेश माळी,रोहील बंडू माळी,मनोज संजय चौधरी,ज्ञानेश्वर संजय माळी,दिपक रत्नाकर सोनार, सुखदेव नन्नवरे, दिपक माळी,वैभव गंगवणे, संदीप माळी, विशाल पाटील,रिवेश माळी, भुषण माळी,पवन माळी तर जळगाव शहरातील अनामिका मेहरा, त्यांची कन्या आरोही मेहरा आणि पती रुपेश मेहरा

हे सर्व भाविक सुरक्षित असून या सर्व भाविकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्या सुटकेसाठी उत्तराखंड प्रशासन व दिल्लीतील महाराष्ट्र सदनमार्फत तातडीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

हेही वाचा : Update : उत्तरकाशीत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन तातडीने उत्तराखंडला रवाना

बातमी शेअर करा !
Share
Tags: devotees stranded in Uttarakhandflash foodgulabrao patilsuvarna khandesh liveuttarakhand

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

विशेष मतदार यादी पुनरिक्षण अभियानास मतदारांनी योग्य आवश्यक ती माहिती देवून सहकार्य करावे – प्रांताधिकारी भूषण अहिरे

March 12, 2026
मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

March 11, 2026
चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

March 11, 2026
कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

March 11, 2026
VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page