• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home क्राईम

pune crime news : सपासप वार करून माजी उपसरपंचाचा खून, पुण्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 1, 2024
in क्राईम, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
pune crime news

पुणे जिल्ह्यात माजी उपसरपंचाचा खून

शिक्रापूर (पुणे) – गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, आत्महत्या तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. पुण्यात कोयत्या गँगच्या धुमाकुळाचीही राज्यभरात चर्चा झाली होती. यातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आल्याची घटना मागच्याच महिन्यात घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दिवसाढवळ्या पुण्यात हत्येचा थरार पाहायला मिळाला आहे.

अज्ञात हल्लेखोराने माजी उपसरपंचावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निघृण हत्या केली. दत्ता गिलबिले असे हल्ला झालेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील शिक्रापूरच्या माजी उपसरपंचावर अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात दत्ता गिलबिले यांचा मृत्यू झाला आहे.

शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले हे आज रविवारी दुपारच्या वेळेस आपल्या बंगल्याच्या आवारात खुर्चीमध्ये बसलेले असताना आरोपींनी धारदार शास्त्राने त्यांच्या मानेवर वार केले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दत्ता गिलबिले यांना मृत घोषित केले.

दत्ता गिलबिले यांच्या मानेवर आणि पाठीवर गंभीर वार करण्यात आले होते. यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्ता गिलबिले यांची हत्या का करण्यात आली, याबाबतचे कारण अजून अस्पष्ट आहे. दरम्यान, या हत्येमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहेत.

हेही वाचा – 25 व्या वर्षीच आमदार, आता पक्षाकडून आणखी मोठी जबाबदारी, जयंत पाटलांनी आर. आर. पाटलांच्या लेकासाठी केली ही घोषणा

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newscrime news punemurdermurder in punepune crime newsshikrapur crimeshirur crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page