ईसा तडवी, प्रतिनिधी
पाचोरा, 4 एप्रिल : पाचोरा येथील माळी समाज महासंघाचे मा. जिल्हाध्यक्ष विठ्ठल एकनाथ महाजन यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये जिल्हाध्यक्ष ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर-पाटील, लोकसभा निवडणूक समन्वयक राधेश्याम चौधरी, भाजपा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ व पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये नुकताच प्रवेश केला.
कोण आहेत विठ्ठल महाजन? –
विठ्ठल महाजन यांनी याआधी माळी समाज महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष पदासह,माजी अध्यक्ष- क्षत्रीय माळी समाज पंचमंडळ कृष्णापुरी पाचोरा, माजी जिल्हा संघटक- अ.भा.महात्मा फुले समता परिषद जळगाव, माजी जिल्हाध्यक्ष, भारतीय मानवाधिकार न्याय सुरक्षा परिषद जळगाव, माजी जिल्हा सरचिटणीस शाहीर परिषद जळगाव अशा विविध सामाजिक पदांवर काम केले आहे.
दरम्यान, पाचोरा भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी विठ्ठल महाजन यांच्या प्रवेशानंतर त्यांचे सत्कार करून अभिनंदन केले. तसेच वरील सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा शहर व ग्रामीण मंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.