मुंबई, 23 ऑक्टोबर : माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात प्रवेश केला आहे. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.
राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा पक्षात समावेश केल्यास पक्षाची स्थिती मजबूत होईल, असे अजित पवार म्हणाले. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजकुमार बडोले यांचा गोंदिया भागात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या महत्त्वाच्या भागात पक्षाची स्थिती मजबूत होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 स्टार प्रचारकांची घोषणा –
स्टार प्रचारकांच्या यादीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचा समावेश आहे. पक्षाने नुकतेच पक्षात प्रवेश केलेले ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचीही निवड यावेळी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे हेही पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून प्रचार करणार आहेत.
महाराष्ट्र विधानसभेचं संपूर्ण वेळापत्रक
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 29 ऑक्टोबर
- अर्ज माघार घेण्याची तारीख – 4 नोव्हेंबर
- मतदानाची तारीख – 20 नोव्हेंबर
- मतमोजणी – 23 नोव्हेंबर