मुंबई, 4 ऑक्टोबर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पहिले तीन हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. असे असताना लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता कधी मिळणार याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेा चौथा आणि पाचवा हप्ता हा 10 ऑक्टोबर पर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले होते. राज्य सरकारतर्फे भाऊबीज म्हणून नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये ऑक्टोबर महिन्यात देण्यात येतील, असेही अजित पवार म्हणाले होते. म्हणजेच, ऑक्टोबर महिन्यात लाडक्या बहिणींना एकूण 3000 रुपये मिळणार आहेत. नवरात्रोत्सवानंतर लगेच दसरा आणि दिवाळी असून एकाच वेळी 3000 रूपये राज्य सराकारकडून देण्यात येणार आहेत.
कृपया, सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
https://www.youtube.com/@suvarnakhandeshlivenews
पैसे कधी जमा होणार? –
अजित पवार यांनी घोषणा करताना हे 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यावर कधीपर्यंत येतील, याबाबतही सांगितले होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितल्यानुसार, येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत महिलांना हे 3000 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच, साधारण येत्या सहा ते सात दिवसांत लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा व्हायला सुरूवात होणार आहे.
लाडक्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत तीन हप्त्यांचे पैसे जमा –
महायुती सरकारतर्फे या वर्षीच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. यानंतर त्या योजनाचा लाभ हा महिलांना जुलै महिन्यापासून देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात पात्र महिलांना रक्षाबंधनानिमित्त जुलै महिन्याचे पैसे देण्यात आले होते. तसेच कागदपत्रांची त्रुटी किंवा अन्य कारणामुळे पैसे न मिळालेल्या महिलांना या दोन्ही महिन्याचे 3000 रुपये सप्टेंबर महिन्यात देण्यात आले होते. म्हणजेच, महिलांना आतापर्यंत जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे मिळालेले असून आता ऑक्टोबर महिन्यात आगामी दोन हप्यांचे पैसे दिले जातील.
हेही पाहा : महाराष्ट्राच्या नवदुर्गा: माजी नेमबाजपटू Anjali Bhagwat महिला सुरक्षेवर काय म्हणाल्या?, विशेष मुलाखत