नंदुरबार, 18 मार्च : नंदुरबारमध्ये उद्या रविवारी 19 मार्चला केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन सेमिनाराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हा सेमिनार होईल. सातपुडा कोचिंग झोन या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेतर्फे यूपीएससी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी निशुल्क स्वरुपात हा सेमिनार आहे.
या सेमिनारासाठी सकाळी ठीक साडेआठ वाजेपासून नाव नोंदणीला सुरुवात होणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी इच्छुक विदयार्थ्यांनी नाव नोंदणी करायची आहे, असे आवाहन सातपुडा कोचिंग झोन, या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
सेमिनार कुठे होणार –
हा फ्री सेमिनार सातपुडा कोचिंग झोन, पहिला मजला, जेयू कॉम्पलेक्स, जैन मंदिराशेजारी, दादावाडी, नंदुरबार येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सेमिनारचे लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयआरएस अधिकारी अजय खर्डे, तसेच महेश ठाकरे (upsc mains 2022) हे उमेदवारांना मार्गदर्शन करतील. इच्छुक उमेदवारांनी फ्री नाव नोंदणीसाठी 8999171231,9359266897 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
IAS म्हणजे देशातील सर्वात अभिमानास्पद पद आहे. या पदासाठी जगातील काही कठीण परीक्षांपैकी एक असलेली UPSC परीक्षा द्यावी लागते. म्हणूनच प्रचंड मेहनतीनंतर IAS होण्याची संधी मिळते.