नागपूर : महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. घरकुलांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला आहे. त्याचीही तरतूद आम्ही करणार आहोत, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. काल नागपूर येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या आठवड्यात वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल आणि ज्याठिकाणी लिलाव झाले नाही आणि ज्याठिकाणी आम्हाला ईसीची (environment clearance) परवानगी मिळाली आहे, त्याठिकाणी वाळू घाट लिलाव होतील. घरकुलांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेला आहे. त्याचीही तरतूद आम्ही करणार आहोत. एकंदरीत जेवढी मागणी तेवढा पुरवठा होईल, असं वाळू धोरण तयार करतो आहेत, असे ते म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील लाखो घरकुल लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
काय आहे एम सँड योजना –
राज्य सरकार लवकरच एम-सॅन्ड ही योजना आणणार आहे. यामध्ये जे दगड खाणीवरुन तयार केलेली वाळू, ज्या वाळूचे क्रशर्स मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात प्रमोट करत आहोत, प्रत्येक जिल्ह्यात वाळू तयार करणारे स्टोन क्रशर त्यातून रिव्हर्स सँड याची मागणी कमी होईल, त्यामुळे पुढील दोन वर्षात वाळुची जी मागणी आणि पुरवठा यातील फरक तो दूर होईल. मोठ्या प्रमाणावर प्रत्येक जिल्ह्यात आता स्टोन क्रशर लागणार आहे. त्यातून वाळू तयार होणार आहे, अशी माहितीही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
हेही वाचा – ज्येष्ठ नेते शरद पवारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र, पंतप्रधानांच्या भाषणाचं कौतुक करत एक विनंतीही केली