मुंबई, 7 डिसेंबर : राज्याच्या महायुती सरकरमधील मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज 9 डिसेंबर रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशनात 200 आमदारांपैकी 173 जणांचा शपथविधी पार पडला. यामध्ये जामनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गिरीश महाजन यांनी संस्कृतमध्ये आमदारकीची शपथ घेतली. यानंतर महाजन यांच्या शपथविधीची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
गिरीश महाजन यांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ –
जामनेर विधानसभा मतदारसंघातून गिरीश महाजन यांनी सलग सातव्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे यांचा पराभव केला. दरम्यान, आज विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी सुरू असताना गिरीश महाजन यांनी संस्कृत भाषेत आमदारकीची शपथ घेतली. दरम्यान, मी सहा वेळा आमदारकीची शपथ ही मराठीत नाही तर संस्कृतमध्येच घेतली. त्यामुळे मी आताही संस्कृतमध्ये शपथ घेतली असे यावेळी त्यांच्या शपथविधीबाबत चर्चा सुरू असताना गिरीश महाजन यांनी सांगितले.
View this post on Instagram
‘या’ आमदारांनी घेतली संस्कृतमध्ये शपथ –
गिरीश महाजन यांच्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी देखील संस्कृतमध्ये शपथ घेतली. तसेच पुढे भारतीय जनता पक्षाचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही संस्कृतमध्येच आमदारकीची शपथ घेतली. यानंतर सांगलीचे भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनीही यावेळी संस्कृतमध्येच आमदारकीची शपथ घेतल्याचे पाहायला मिळाले.
विशेष अधिवेशनात आमदारांचा शपथविधी –
राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला आज सकाळी 11 वाजता सुरूवात झाली. तीन दिवसांच्या या अधिवेशनकाळात राज्यपालांचे अभिभाषण, आमदारांचे शपथविधी तसेच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. दरम्यान, नवनिर्वाचित 288 आमदारांच्या शपथविधीला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दिवशी 200 पैकी 173 आमदारांनी आज शपथ घेतली.
Vidhansabha Session Live : विधानसभा विशेष अधिवेशन 2024; नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी लाईव्ह