जळगाव, 17 एप्रिल : तुम्हाला जर एवढं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर तुम्ही शिवजयंतीच्या दिवशी देशभर का सुट्टी जाहीर करत नाहीत, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना केला होता. दरम्यान, भाजपचे जेष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंच्या सवालावरून प्रतिप्रश्न केलाय.
गिरीश महाजन काय म्हणाले? –
ते आज शिवजयंतीच्या दिवशी देशभर सुट्टी जाहीर करा अस सांगाताएत. मात्र, इतक्या दिवसांपासून ते झोपले होते का ज्यावेळी ते मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांना याबाबत का मागणी केली नाही. तुम्ही काय केलं त्यावेळी असा खोचक सवाल मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आदर्श आहेतच. महाराष्ट्रात शिवजयंतीच्या दिवशी सुट्टी असते. देशभर सुट्टी जाहीर करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी योग्य ते निर्णय घेतील. असेही मंत्री महाजन म्हणाले. तसेच आता काही कामं उरली नाहीत म्हणून विनाकारण काही सांगायचं, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते? –
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रापुरता सिमित नसून सर्व जगाच्या कानाकोपऱ्यात ते पोहोचलेले आहेत. पण खरोखर, तुम्हाला त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा. आमच्या देशाचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी देशभर सुट्टी जाहीर करा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिलंय. दरम्यान, इकडे येऊन फक्त मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय असे बोलू नका, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.
हेही वाचा : “….तिच्या हातात गंगाजल, ती खोटं बोलणार नाही!” तुलसी गबार्ड यांचं नाव घेत राऊतांची ईव्हीएमवरून जोरदार टीका