• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home चाळीसगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत; जलसंवर्धनाचा जागर, जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 29, 2026
in चाळीसगाव, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत; जलसंवर्धनाचा जागर, जलसंपदा मंत्री राधाकृष्णन विखे पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

चाळीसगाव, 29 एप्रिल: दक्षिणेकडील खान्देशाचे प्रवेशव्दार असणा-या चाळीसगावात मंगळवारी कन्नड घाटाच्या पायथ्याशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या गगनभेदी गजरात श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर आणि चौंडी येथून प्रारंभ झालेल्या ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे दूपारी जोरदार स्वागत करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त या जलयात्रेचे आयोजन करण्यात आले असून तिचा खान्देशात प्रवेश झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी यात्रेचे स्वागत केले.

यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह खा. रामराव वडकूते, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांच्यासह हजारो जलयात्री यांची प्रमुख उपस्थिती होती. बंजारा समाजबांधवांनी देखील यावेळी यात्रेचे स्वागत केले. कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रतिभा चव्हाण,उपनगराध्यक्ष हर्षल चौधरी,बाबा महाराज मोरे, अर्जुन जगताप,रोहिणी नायडू, दिपक सूर्यवंशी, बाजार समितीचे सभापती प्रदीप पाटील, नगरसेवक, उपसभापती शैलेंद्रसिंह पाटील, धनगर समाज संघटना आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरात ठिकठिकाणी स्वागत –

भव्य रथ त्यावर जलसंवर्धनाचा संदेश देणारा देखावा असे या जलयात्रेचे प्रबोधनात्मक रुप असून नागद रोड चौफुली येथेही यात्रेचे उत्साहात स्वागत केले गेले. पाटणादेवी रोडस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला जलसंपदा मंत्री विखे – पाटील याआच्यासह आमदार श्री चव्हाण व  उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिवादन केले.

यानंतर हॉटेल दयानंद, घाट रोड मार्गे आलेल्या जलयात्रेचे व रथाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकतील  मैदानातही उत्सूर्फत स्वागत करण्यात आले. नागरिक, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. जलयात्रेव्दारा जलसंवर्धन, पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन, जलसाक्षरता आणि समाजातील जनजागृती यांना चालना देण्याचा ठाम संदेशही देण्यात आला.

300 व्या जयंतीनिमित्त जागर –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने जलसंपदा विभागातर्फे आयोजित करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण जलसंवर्धन चळवळ आहे. नद्यांचे अस्तित्व टिकवणे, जल व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवनाचा संदेश देणे याव्दारे देण्यात येत आहे. २५ ते २९ एप्रिल दरम्यान ही यात्रा काढण्यात येत असून २६ एप्रिल रोजी शिर्डी येथे दोन्ही यात्रांचा संगम झाला. यात्रेत ३० नद्यांच्या कलशातून जल आणून जलसंवर्धनाचा संदेश दिला जात आहे. ५०० हून अधिक जलयात्री, वारकरी, युवक आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहे. यात्रेदरम्यान अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर आधारित चित्रफीत दाखवली जात आहे.

हेही वाचा: पाचोरा-भडगावमध्ये गेल्या 10–12 वर्षांत शेतीत सकारात्मक परिवर्तन; आता शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – आमदार किशोर आप्पा पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: chalisgaon newsgoda to narmada jal yatramarathi newsminister radhakrishn vikhe patilsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यूरियासोबत इतर खते घेण्याची सक्ती बेकायदेशीर; तक्रार करताच होणार कठोर कारवाई

August 3, 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ संकल्प अभियानाचा शुभारंभ

August 3, 2026
आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती!

August 3, 2026
लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page