जळगाव : कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत हत्या केल्याची धक्कादायक घडली होती. याप्रकरणी आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील नियुक्तीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे आपल्याला कळवल्याचे उज्ज्वल निकल यांनी स्पष्ट केले आहे.
कामकाजाला सुरुवात केव्हा होणार –
कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत हत्या केल्याची धक्कादायक घडली होती. याप्रकरणी आता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे आपल्याला कळवल्याचे उज्वल निकम यांनी स्पष्ट केले आहे. तसेच कल्याण पोलिसांनी याबाबत आरोपपत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिली.
समाजात अशा ज्या घटना घडतात त्याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तसेच अशा गुन्ह्यात ताबडतोब शिक्षा होणे आणि लवकरात लवकर कामकाज पार पाडणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचे आहे, असे उज्ज्वल निकम म्हणाले. कल्याणच्या गुन्ह्यातही पोलिसांचा तपास झाल्यानंतर लवकरच खटला सुरू होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
Success Story : भाऊ-बहिणीची सैन्यदलात निवड; एकाच कुटुंबातील 4 भावंडं देशसेवेसाठी सज्ज
नेमकं काय आहे प्रकरण –
कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आली. यानंतर नराधम विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका रिक्षाचा वापर केला. तसेच ज्या रिक्षातून मृतदेह नराधम घेऊन गेला होता ती रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे.
यावेळी नराधम विशाल गवळी स्वतः रिक्षा चालवत होता तर त्याची पत्नी साक्षी मृतदेह घेऊन रिक्षाच्या मागील सीटवर बसली होती. जवळपास 13 किलोमीटर अंतरावर मृतदेह घेऊन जात बापगाव मधील कब्रस्तानजवळ मृतदेह फेकून या दोघांनी पळ काढला. यानंतर आधारवाडी परिसरात असलेल्या बारमध्ये दारू विकत घेऊन तो पसार झाला.