मिलिंद वाणी, प्रतिनिधी
जळगाव, 7 ऑगस्ट : जळगाव जिल्ह्यातील ज्वारी पेरणी केलेल्या व ज्वारीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यात लवकरच ज्वारी खरेदीसाठी 18 केंद्र सुरु करण्यात येणार असुन ज्वारी खरेदिसाठी जिल्ह्याकरीता एकूण 95,000 कि. उदिष्ट प्राप्त झाले होते. त्यास आता मुदत वाढ मिळाली आहे त्यामुळे जिल्हातील शेतकऱ्यांची ज्वारी खरेदीचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पणन महासंघ उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिली आहे.
काय आहे संपुर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्यात एकुण 5,327 शेतकऱ्यानी नोंदनी केलेली आहे. 31 जुलै 2024 अखेर 2, 495 शेतकऱ्यांकडून 84,112 कि. ज्वारी खरेदी झालेली आहे. ज्वारी खरेदीसाठी जिल्ह्याकरीता एकूण 95,000 कि. उदिष्ट प्राप्त झाले होते. व त्याची मुदत 31 जुलै होती. दरम्यान, मंत्री गिरीष महाजन, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे व राज्य शासन व केंद्र शासन यांच्याकडील पाठपुरावा मुळेच जिल्हास वाढीव उदिस्ट (95,000कि.) मिळाले. खरेदीस जी मुदत संपली होती त्यास विशेष परवांगी केंद्र शासनाकडुन काल (दिनांक 31 ऑगस्ट 2024) पर्यंत प्राप्त झाले आहे.
दरम्यान, याकामी आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे तसेच संजय पवार यांचे देखील सहकार्य लाभले असल्याचे रोहित निकम यांनी सांगितले. तरी जळगाव जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी आपले धान्य आपल्या तालुक्यातील केंद्रावर SMS प्राप्त होताच वेळेत विक्रीसाठी आणवेत, असे आवाहन रोहित निकम यांनी केलंय.
हेही वाचा : “……शक्य करणं हीच माझी ओळख”, लाडकी बहीण योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विरोधकांना प्रत्यत्तर