पाचोरा, 23 जानेवारी : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली जात आहे. पाचोऱ्यातही हिंदुहृदयसम्राट, शिवसैनिकांचे दैवत असलेल्या दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्ताने ठाकरे गटाच्यावतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शिवतीर्थ शिवसेना कार्यालय पाचोरा या ठिकाणी ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, अरुण पाटील (उपजिल्हाप्रमुख, शेतकरी सेना), उद्भवभाऊ मराठे (उपजिल्हाप्रमुख), रमेश बाफ़ना, शरदपाटील (तालुकाप्रमुख), धर्मराजपाटील (उपजिल्हासंघटक), देवीदासपाटील (तालुका संघटक), विनोद बाविस्कर (उपजिल्हा समन्वयक), ज्ञानेश्वर पाटील (तालुका समन्वयक), अनिल सावंत आणि दिपक पाटील (शहरप्रमुख), दत्ताभाऊजडे व राजेंद्र राणा (शहर संघटक), दादाभाऊ चौधरी व बंडुमोरे (शहर समन्वयक), संदीप जैन (युवासेना उपजिल्हाप्रमुख), भुपेश सोमवंशी (युवासेना तालुकाप्रमुख), हरीशदेवरे (युवक शहरप्रमुख), प्रशांत सोनार, गौरव पाटील, जगदिश महाजन, जितेंद्र जैन, पप्पू जाधव, फईम शेख, अजय पाटील, महेंद्रसिंग पाटील, कैलास पाटील, कृष्णा पाटील, अभिषेक खंडेलवाल, आनंद जैन, खंडू सोनवाने, प्रवीण पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, महेश पाटील, समाधान पाटील, मनोहर पाटील, प्रतीक पाटील, हिमांशु पाटील, ओम पाटील, अकबर अली, जीवन मराठे, रोहण राजपुत, संजय चौधरी, योगेश पाटील, पृथ्वीराज पाटील, बबलू भोई, आदी. मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा – पाचोऱ्याच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बाजी, आता विभागीय स्पर्धेचे असणार आव्हान
दरम्यान, आज शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. आंबेडकर भवन इथं संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा करण्यात आली. आगामी काळात स्थानिक स्तरावरही हे समीकरणाचे काय परिणाम दिसतात, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.