कुंडाणे-वार (धुळे), 13 सप्टेंबर : समता शिक्षण संस्था पुणे, संचलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे ता. जि. धुळे येथील, समाजकार्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी धुळे जिल्ह्यातील कुंडाणे येथे जिल्हा परिषद शाळेत आज दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी गुड टच आणि बॅड टच या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित म्हणून लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. विष्णू गुंजाळ प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा.डॉ. प्रीती वाहने ( डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे, ता. जि. धुळे ), कार्यक्रमाला उपस्थित क्षेत्रकार्य मार्गदर्शक , प्रा.डॉ. रघुनाथ महाजन,प्रा डॉ. सुदाम राठोड, प्रा.डॉ. शामसिंग वळवी , तसेच जि. प. कुंडाणे-वार शाळेचे मुख्याध्यापिका रजनी चौधरी, धनंजय वाघ, शोभा पाटील, रूपाली वाघ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. प्रीती वाहणे यांनी गुड टच आणि बॅड टच या विषयावर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. वाढत्या बलात्काराचे प्रमाण यावर शालेय मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे विद्यार्थ्यांना सांगितले. मुलींनी नाही तर मुलांनी देखील स्वतःचे संरक्षण कसे करावे? व आपल्याला अनओळखी व्यक्तीने काय दिले व जर आपल्याला कुठे चुकीचा स्पर्श अन व्यक्तीने किंवा आपले ओळखीचे व्यक्तीने गेले तर आपण आपल्या आईला वडिलांना किंवा आपल्या शिक्षकांना सांगणे या विषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच प्रत्यक्ष कृतीद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षांचे भाषण, प्रा. डॉ. विष्णू गुंजाळ यांनी देखील गुड टच व बॅड टच विषय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच जि. प. शाळेचे मुख्याध्यापिका रजनी चौधरी यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच शोभा पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे नियोजन समाजकार्य महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी, उनेश्वर गावित, तेजस बागुल, अमित बागुल, लक्ष्मी बागुल, धनश्री जाधव, धुरसिंग पावरा, गीता पावरा, शिल्पा पावरा, कविता जगताप ,कृपाली जगताप, दीपक व्हडगर, दिवान परमार, अनु जगदेव, उदय महाले, खुशाल सोनवणे व उपस्थित प्रशिक्षणार्थींनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविका रोहन पाडवी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहेल शिरसाठ यांनी केले. आभार प्रदर्शन सायली शिरसाठ यांनी केले. या कार्यक्रमात कुंडाणे- वार येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनीं शिक्षक व कर्मचारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Video : ‘….अन् बालकाला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीची थेट नदीत उडी,” सांगितला सर्व घटनाक्रम