धरणगाव (जळगाव), 29 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जळगाव ग्रामीणची उमेदवारी मिळाल्यानंतर सोमवारी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी धरणगाव येथील तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी धरणगाव तालुका प्रति बारामती करणार तसेच बेरोजगार तरूणांना रोजगार देणार असे आश्वासन गुलाबराव देवकर यांनी दिले.
धरणगावात गुलाबराव देवकर यांचे शक्तीप्रदर्शन –
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी धरणगाव शहरात शक्तिप्रदर्शन केले. बालाजी मंदिरापासून ते तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या ऐतिहासिक रॅलीने धरणगाव शहरातील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजराने अख्खे धरणगाव शहर दणाणून गेले होते. महाविकास आघाडीचे हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे (ठाकरे गट) सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, जळगाव जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, जिल्हा समन्वयक वाल्मीक पाटील, युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पंकज महाजन, जळगाव महानगराध्यक्ष एजाज मलीक, महिला अध्यक्षा मंगला पाटील, कार्याध्यक्ष शालीग्राम मालकर, राजेंद्र चौधरी, श्रीराम पाटील, सामाजिक न्यायचे प्रदेश सरचिटणीस रामचंद्र जाधव, जळगाव तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, धरणगाव तालुकाध्यक्ष धनराज माळी, युवक तालुकाध्यक्ष मनोज पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी, दीपक वाघमारे, शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भाऊसाहेब सोनवणे, शिवसेना ठाकरे गटाचे धरणगाव तालुकाध्यक्ष जयदीप पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष उमेश पाटील, काँग्रेसचे धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही.डी.पाटील, ज्येष्ठ नेते सुरेश चौधरी, लकी टेलर आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Breaking : शिवसेना ठाकरे गटाने चोपड्याचा उमेदवार बदलला, कुणाला मिळाली संधी?