जळगाव, 26 सप्टेंबर : जळगाव ग्रामीणची जागा ही राष्ट्रवादीला नाहीच. राष्ट्रवादीकडे कोणताही उमेदवार नसून ही जागा शिवसेना उबाठाची आहे. असा दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला होता. दरम्यान, या दाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यामुळे माझी उमदेवारी निश्चित असल्याचे देवकर यांनी म्हटलंय. ते जळगावात पत्रकारांसोबत बोलत होते.
गुलाबराव देवकर यांचे प्रत्युत्तर –
गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला प्रत्तुत्तर देताना गुलाबराव देवकर म्हणाले की, महाविकास आघाडीची अंतिम बैठक व्हायची राहिलेली आहे. ज्या पक्षाचा उमदेवार इलेक्टिव्ह मेरिटचा असेल त्या पक्षाला ती उमेदवारी असे महाविकास आघाडीचे धोरण आहे. आता आमच्यात मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. तसेच उबाठामधून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असतील. या सगळ्या उमेदवारांचा विषय महाविकास आघाडीच्या एकत्रित बैठकीत होईल. यानंतर ज्या पक्षाचा उमदेवार इलेक्टिव्ह मेरिटचा असेल त्या पक्षाला ती उमेदवारी दिली जाईल. दरम्यान, गुलाबराव पाटील हे दिशाभूल करण्याचाप्रयत्न करत असल्याचा आरोप देवकर यांनी केला.
View this post on Instagram
जळगाव ग्रामीणमध्ये मीच प्रबळ उमेदवार –
मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे रितसर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. यामुळे माझी उमदेवारी निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून जळगाव ग्रामीण मतदरासंघात नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने फिरतोय त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आलोय. आणि त्यामुळे जळगाव ग्रामीणमध्ये प्रबळ उमेदवार मीच आहे. आणि मला खात्री आहे की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल, असा विश्वास गुलाबराव देवकर यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पत्रकारांना उमेदरावी अर्ज दाखल केल्याचा पुरावा दाखवत गुलाबराव पाटील यांच्या दाव्याला खोडून काढले.
मंत्री गुलाबराव पाटील काय म्हणाले होते? –
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले होते की, जळगाव ग्रामीणची जागा ही राष्ट्रवादीकडे नाहीच. राष्ट्रवादीकडे कोणता उमेदवार त्यांना नाव सांगाव तसेच त्यांनी अर्ज दाखल केलाय का हेही जाहीर कराव. नाही. ही जागा शिवसेना उबाठाची आहे. पण त्यांच्याकडे उमेदवार नाही. दरम्यान, मी उमेदवारी अर्ज भरलाय आणि मी निवडणूक लढणार असे त्यांनी जाहीर करावे, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले होते. दरम्यान, माझे हे गुलाबराव देवकर यांना आव्हान नसल्याचेही त्यांनी स्पष्ठ केले होते.
हेही पाहा : Jalgaon जिल्ह्यातील एमरजन्सी लोडशेडिंग कधी बंद होणार?, IAS Ayush Prasad Exclusive Interview