• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 29, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
Health check-up of citizens across the state through the 'Shri Ganesha Arogyacha' initiative, an initiative of the Chief Minister's Medical Assistance Fund Cell

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून संपूर्ण राज्यात नागरिकांची आरोग्य तपासणी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार

मुंबई, 29 ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जात आहेत.

या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टर यांचा संयुक्त सहभाग राहणार आहे. याशिवाय मोठ्या संख्येने गणेश मंडळे या उपक्रमात सक्रिय सहभागी झाले आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जात आहे.

नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता –

शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार असून, तपासणी दरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचार संबंधित योजनांतर्गत मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमाचा उद्देश फक्त तपासणीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या आरोग्याबाबत सातत्यपूर्ण जागरूकता निर्माण करणे हा देखील आहे.

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, स्थानिक वैद्यकीय महाविद्यालये, तसेच धर्मादाय रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सक्रिय सहभागी झाले आहेत.

गणेशमंडळांकडून व्यापक जनजागृती –

नागरिकांना या उपक्रमाची माहिती मिळावी यासाठी मागील आठवडाभर गणेश मंडळांकडून बॅनर, पत्रकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती सुरू आहे. परिणामी या शिबिरांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक आणि भाविक पुढे येत आहेत. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे.

गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणे ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिनव कल्पना आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत आहे. तपासणीदरम्यान आजार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारही दिले जाणार आहेत. हा उपक्रम म्हणजे आरोग्यसेवेतील लोकाभिमुख आणि जनहिताचा उत्तम आदर्श ठरत आहे, असे मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: devendra fadnavisganeshotsavganeshotsav 2025healthRameshwar Naik

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

बहुलखेडा येथे पीएसआय संजय तडवी यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप

July 14, 2026
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्ह्यात 15 जुलै रोजी रोजगार मेळावा; इलेक्ट्रिकल क्षेत्रातील २०७ हून अधिक रिक्त पदांसाठी संधी

July 14, 2026
VIDEO | कापूस क्रांतीची नवी दिशा! कमी अंतरावरील घनलागवडीने उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न; पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग

VIDEO | कापूस क्रांतीची नवी दिशा! कमी अंतरावरील घनलागवडीने उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाचा प्रयत्न; पाचोरा तालुक्यात 1 हजार 280 हेक्टरवर प्रयोग

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page