जळगाव, 27 डिसेंबर : गेल्या काही दिवसांपासून हवामानात कमालीचा बदल झाला आहे. बदलत्या हवामानामुळे राज्यात अवकाळी पावसाचे सावट आहे. असे असताना आज राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रब्बी हंगामीतील पिकांना या अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा –
हवामान विभागाच्या अंदाजनुसार, राज्यातील थंडीची लाट ओसरली असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह विदर्भातही अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यात पुढचे 48 तास खूपच महत्वाचे असून महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, 27 आणि 28 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हेही पाहा : आठवड्यात 6 जणांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील अपघात कधी थांबणार?, जिल्हाधिकारी Ayush Prasad Exclusive
‘या’ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज –
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे शेतकऱ्यांना आवाहन –
हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार 27 आणि 28 डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील विविध भागात 18 ते 25 मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुठल्याही पद्धतीने नुकसाने होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत. कापूस काढून बाहेर ठेवले असेल अथवा कुठलेही पीक काढून सुकायला बाहेर ठेवले. यासाठी पावसामुळे त्या पीकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना झाकून ठेवले पाहिजे. कदाचित पावसामुळे शेतपीकांचे नुकसाने झाले तर संबंधित शेतकऱ्यांना 72 तासांच्या आता पीक विम्याच्या अॅप द्वारे माहिती भरून घ्या. आणि यासाठी तलाठी तसेच कृषी सहायकांचे सहकार्य घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
तसेच रस्ते विभाग तसेच महावितरणला अलर्टमोडवर ठेवण्यात आले आहे. स्थानिक पुरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नगरपरिषद तसेच महापालिकेला योग्य त्या सूचना देण्यात आले असल्याचेही जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले.
हेही पाहा : मुक्त विद्यापीठात शिक्षण, शिपाई ते आता आर्मीत मोठा अधिकारी lieutenant ashok patil khandesh interview