जळगाव, 11 सप्टेंबर : राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत असताना पुन्हा एकदा आज मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली. हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मुसळधार पावसाचा इशारा –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
हेही पाहा : Video : ओळख प्रशासनाची, प्रांताधिकारी पदाच्या जबाबदाऱ्या काय, त्यांचं कामकाज कसं चालतं?
उद्यापासून पावसाची विश्रांती? –
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, राज्यात आज (बुधवार) पर्यंतच पावसाचा अंदाज आहे. उद्यापासून (गुरुवार) राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. तसेच पुन्हा एकदा 16 सप्टेंबरपासून पाऊस सक्रिय होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज –
जळगाव जिल्ह्यातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम ते मुसळधार पाऊस झालाय. काही ठिकाणी कोरडे वातावरण बघायलं मिळतय. दरम्यान, आतापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यांत वाढ झाली आहे. दरम्यान, आज जिल्ह्यातील काही भागात उष्ण (कोरडे) ते काही भागात ढगाळ वातावरण राहणार असून हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हेही पाहा : Jalgaon Police : चिमुकल्याला वाचविण्यासाठी पोलीस तरूणीने नदीत घेतली उडी, जळगावात नेमकं काय घडलं?