पाचोरा, 29 एप्रिल : एकीकडे प्रचंड उन्हाचा उकाडा जाणवत असताना पाचोरा तालुक्यातील लासगाव परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास 15 ते 20 मिनिटे याठिकाणी पाऊस झाला. विशेष म्हणजे पाऊस सुरू होण्यापूर्वी गारांचा वर्षाव याठिकाणी पाहायला मिळाला. गारांच्या वर्षावानंतर याठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली.
गेल्या दोन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली आहे. या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी केळी पिकांबरोबरच इतर पिकांचे, घरांचे तसेच विद्युत पोल व तारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच आज पाचोरा तालुक्यातील लासगाव परिसरात ढगाळ वातावरण तयार झाले होते. यादरम्यान, सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास 15 ते 20 मिनिटे याठिकाणी पाऊस झाला. यावेळी सुरूवातीला याठिकाणी गारांचा वर्षाव झाला. त्यानंतर जवळपास 15 ते 20 मिनिटे अवकाळी पाऊस झाला.
जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन –
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली असून प्रशासकीय पातळीवरुन आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहेत. मदतकार्यासाठी नागरिकांनी 02572217193 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी केले आहे.