• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक; आयुष प्रसाद यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 21, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक; आयुष प्रसाद यांनी दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

जळगाव, 25 मे : मान्सून काळात संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करावे, कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आज मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभ क्षेत्र प्राधिकरण कडा गणेश भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नरवीर रावळ, उपआयुक्त महानगरपालिका गणेश चाटे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अदिती कुलकर्णी, शहर अभियंता मनीष अमृतकर, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहायक नासिदूल इस्लाम आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील गावांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन धरणातून विसर्ग नियंत्रित ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. पूर निवारणासाठी पाटबंधारे विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच नद्यांमधील गाळ तात्काळ काढून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी सूचनाही देण्यात आली. नदीवरील पूल सुरक्षित राहतील यासाठी खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले.

जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करावी. आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीच्या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध साठा, रुग्णवाहिका व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांची तयारी तपासावी.

अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ काढण्याचे आदेश –
पावसाळ्यात अपघात टाळण्यासाठी जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंग्ज तात्काळ काढून टाकावेत, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यासंदर्भात सर्व नगरपालिका प्रशासनांनी सर्वेक्षण करून अहवाल सादर करावा, असेही निर्देश देण्यात आले.

दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत –
महावितरणने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत. आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना ‘आपदा मित्र’ म्हणून प्रशिक्षण देऊन आपत्ती व्यवस्थापन किट उपलब्ध करून द्यावेत. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व विभागांना वितरित करण्यात आलेले शोध व बचाव साहित्य तपासून सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, सर्व विभागांनी आपल्या कार्यालयात 24×7 नियंत्रण कक्ष सुरू करावा, असेही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : पाचोऱ्यासह जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पुढील दोन दिवस पावसाचे; हवामानाचा नेमका अंदाज काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: ias ayush prasadjalgaon newsmonsoonrain alertzp ceo minal karanwal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | Erandol Bus Accident : एरंडोल तालुक्यात बसचा अपघात, एकाचा मृत्यू; 40 जण जखमी | नेमकं काय घडलं?

Video | Erandol Bus Accident : एरंडोल तालुक्यात बसचा अपघात, एकाचा मृत्यू; 40 जण जखमी | नेमकं काय घडलं?

August 1, 2025
Video | “आता जर यापुढे कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर….”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्वाच्या सूचना

Video | “आता जर यापुढे कोणी बेशिस्त वर्तवणूक करेल तर….”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्वाच्या सूचना

August 1, 2025
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता उद्या 2 ऑगस्ट रोजी होणार वितरित; जळगावात ‘पी.एम. किसान उत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन

August 1, 2025
महसूल दिन 2025 : जळगाव जिल्ह्यात 73 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

महसूल दिन 2025 : जळगाव जिल्ह्यात 73 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा उत्साहात संपन्न

August 1, 2025
आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

आजपासून पुढील सात दिवस महसूल सप्ताह; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज – प्रांताधिकारी भूषण अहिरे

August 1, 2025
Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

Video | खासदार स्मिता वाघ यांनी ‘या’ दोन रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची लोकसभेत केली मागणी

July 31, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page