• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

साहित्य संमेलनस्थळी जाणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 29, 2024
in जळगाव जिल्हा, खान्देश
साहित्य संमेलनस्थळी जाणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला आढावा

जळगाव, 29 जानेवारी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अंतिम टप्प्यातील तयारीचा आढावा घेतला. साहित्य संमेलनाच्या आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही. याची दक्षता घेण्याच्या प्रशासनाला व आयोजन समितीच्या पदाधिकाऱ्यांना‌ त्यांनी सूचना दिल्या.

अमळनेर येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ कालावधीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. साहित्य संमेलन तयारी अंतिम टप्प्यात आली असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रताप महाविद्यालयात बैठक घेत तयारीचा आढावा घेतला. याप्रसंगी खान्देश शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिल शिंदे, उपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, संचालक निरज अग्रवाल, मराठी वाड्•मय मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अविनाश‌ जोशी, अमळनेर उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलीस उपअधीक्षक सुनिल नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विकास देवरे तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

साहित्य संमेलन स्थळावर राज्यसभा सदस्य व्ही. मूरलीधरन‌ यांच्या खासदार निधीतून सुरू असलेल्या स्वच्छतागृह बांधकाम प्रगतीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. सध्या हे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या निधीतून साहित्य संमेलन स्थळाकडे जाणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानात संमेलनस्थळाकडे जाणाऱ्या चारही दिशेने जाणाऱ्या व येणाऱ्या रस्त्यांच्या कामांचे मजबुतीकरण, डांबरीकरण, कॉंक्रीटीकरण पूर्ण झाली असल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

महावितरणच्या माध्यमातून करण्यात कामांचाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला. स्वच्छता, पाणीपुरवठा, पोलीस बंदोबस्त, वाहतूक आराखडा, व्हीआयपी पाहुण्यांसाठी साहित्य संमेलन स्थळी पोहचण्याचा पर्यायी मार्ग, पार्किंग व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, हेलिपॅड व्यवस्थेचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. प्रत्येकाला नेमून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी संमेलन स्थळातील मंडप, संमेलन स्थळाकडे येणाऱ्या रस्त्यांच्या कामांची,‌पर्यायी मार्ग व हेलिपॅडच्या कामांची पाहणी केली.

हेही वाचा : विद्या पाटील यांनी तालुक्याचा लौकीक वाढविला; वैशाली सुर्यवंशी यांचे प्रतिपादन 

बातमी शेअर करा !
Share
Tags: akhil bharatiya sahitya sammelan amalnerias ayush prasadsahitya sammelan amalnerअखिल भारतीय साहित्य संमेलन अमळनेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

June 17, 2025
‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

June 17, 2025
आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

आमदार किशोर आप्पा पाटील रमले जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसोबत; शाळेच्या पहिल्या दिवशी पाचोरा-भडगाव तालुक्यातील विविध शाळांना दिल्या भेटी

June 17, 2025
जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव जिल्ह्यातील 1 हजार 860 शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात; खासदार-आमदार, अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

June 16, 2025
Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

Video : पालकमंत्री गुलाबराव पाटील बैलगाडीतून विद्यार्थ्यांसोबत शाळेत दाखल, पाहा व्हिडिओ

June 16, 2025
Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

Video | ‘….त्यामुळे हा पूल कोसळला!’ घटनास्थळाच्या पाहणीनंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

June 16, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page