संदीप पाटील, प्रतिनिधी
पारोळा, 18 जुलै : आयडियल इंग्लिश स्कूल पारोळा येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी च्या विविध गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी व वारकरी या वेषांमध्ये विद्यार्थ्यांची स्कूल ते बालाजी मंदिर अशी मिरवणूक काढण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ शांताराम पाटील, कार्यकारी संचालक डॉ. पंकज पाटील, उपाध्यक्ष संकेत शांताराम पाटील यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्कूलच्या प्राचार्य भाग्यश्री संकेत पाटील सर्व शिक्षका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमली पिंपळगाव हरेश्वर नगरी –
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं. आषाढी एकादशी निमित्त श्री समर्थ गोविंद महाराज मंदिरात आज परंपरेनुसार दुपारी बारा वाजता माध्यान्ह आरती केली गेली. आषाढी एकादशीनिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथील यात्रेत आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी उपस्थित भक्तांनी विठू नामाचा गजर केल्याने मंदिरातील परिसर दुमदुमून निघाला.
हेही वाचा : आषाढी एकादशी विशेष : विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमली पिंपळगाव हरेश्वर नगरी