• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद; मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 21, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीने होणारी विक्री बंद; मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई, 21 मे: राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांकडून अनुदानित खतांच्या विक्रीसोबत विनाअनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते, जैवउत्तेजके सक्तीने विक्री (टॅगिंग/लिंकिंग) केली जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत संबंधित प्रकाराला तत्काळ बंदी घालण्याचे आदेश जारी केले असल्याची माहिती, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

इतर कोणत्याही उत्पादनांची सक्ती करण्यास मनाई –

भारत सरकारच्या रसायने व खते मंत्रालयाच्या खत विभागानेही खतांसोबत इतर उत्पादनांचे ‘टॅगिंग’ करणे हे बेकायदेशीर आणि अन्यायकारक असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य शासनाने आता अनुदानित खतांचा पुरवठा करताना इतर कोणत्याही उत्पादनांची सक्ती करण्यास मनाई केली आहे.

शासन निर्णयानुसार, राज्यातील अनुदानित खतांचे उत्पादक आणि पुरवठादार कंपन्यांना त्यांच्या परवान्यात नमूद असलेल्या अनुदानित रासायनिक खतांव्यतिरिक्त इतर विनाअनुदानित खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये, जैवखते, जैवउत्तेजके यांचा पुरवठा व विक्री करता येणार नाही. या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना कृषी आयुक्तालय, पुणे यांना देण्यात आल्या आहेत.

तसेच, कोणतीही कंपनी किंवा विक्रेता टॅगिंग अथवा लिंकिंग करत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांना आवश्यक असलेले अनुदानित खत सहज आणि योग्य दरात मिळणे हा त्यांचा हक्क आहे. खतांसोबत इतर उत्पादनांची सक्तीची विक्री कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर शासन कठोर कारवाई करेल.”

हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला असून शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून याकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा: उपनिबंधकासह खासगी इसम Anti Corruption पथकाच्या जाळ्यात; दीड लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले, नेमकं प्रकरण काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahayuti governmentmarathi newsminister dattatray bharnenon-subsidized fertilizerssubsidized fertilizerssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्ग प्रकल्प; रावेर, यावल, फैजपूर व सावदा शहरांतील मुख्य रस्त्यांचे होणार काँक्रीटीकरण

July 6, 2026
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या जामनेर तालुका अध्यक्षपदी हजराताई गनी तडवी यांची निवड

July 6, 2026
राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; विविध दुर्घटनांत 9 जणांचा मृत्यू, अनेक भागांत जनजीवन विस्कळीत

July 6, 2026
पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा 24 बाय 7 ‘अलर्ट मोड’वर ठेवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 6, 2026
माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

July 5, 2026
गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

July 5, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page