• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home करिअर

विदेशात शिक्षण घ्यायचंय का? भारत सरकारच्या ‘या’ स्कॉलरशिप्सची होईल मदत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 10, 2023
in करिअर, देश-विदेश
विदेशात शिक्षण घ्यायचंय का? भारत सरकारच्या ‘या’ स्कॉलरशिप्सची होईल मदत

Photo Credit - Canva

जळगाव, 10 जानेवारी : शिक्षण हे प्रत्येकाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी अनेक जणांचा परदेशातील शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा असते. मात्र, अनेकांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अनेकांना परदेशात शिक्षण घेता येत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या मदतीने आपली स्वप्ने साकार करता येऊ शकतात.

विविध स्कॉलरशिपच्या माध्यमातून विद्यार्थांना परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळते. तिथे राहायच्या खर्चाचे पैसेही त्यांना या स्कॉलरशिपच्या माध्यमातून मिळतात. मग परदेशात शिक्षण्यासाठी भारत सरकारच्या वतीने विद्यार्थ्यांना कोणकोणत्या शिष्यवृत्ती दिल्या जातात, याबाबत जाणून घेऊयात.

गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप – 

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाकडून अनेक शिष्यवृत्ती दिल्या जातात. यामध्ये नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजनेचाही समावेश आहे. ही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती, लुप्त होत असलेल्या भटक्या-विमुक्त जमाती, तसेच भूमिहीन शेतमजूर, पारंपरिक कारागीर आणि पारंपरिक कारागीर श्रेणीतील विद्यार्थ्यांना दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी, nosmsje.gov.in या अधिकृत वेबसाइटला तुम्हाला भेट द्यावी लागेल. शिष्यवृत्ती फॉर्ममध्ये, तुम्हाला वैयक्तिक तपशील, अभ्यासक्रमाचं नाव आणि परदेशी विद्यापीठाचे नाव नमूद करावे लागेल. याशिवाय पुराव्यासाठी अनेक कागदपत्रे सादर करावी लागतात. इच्छुक विद्यार्थ्याला किमान 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण असले पाहिजेत. परदेशात जाऊन पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आणि पीएचडी करण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप – 

अल्पसंख्याक मंत्रालयातर्फे अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी ‘पढो परदेश’ ही योजना राबवली जाते. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही minorityaffairs.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. तसेच या योजने अंतर्गत परदेशातील शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज माफ केलं जातं. यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा बँक तपशील द्यावा लागतो.

पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप –

केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप प्रोग्राम चालवला जातो. ही फेलोशिप फक्त भारतीय नागरिकांना दिली जाते. परदेशी संस्थांमध्ये पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणे हा या फेलोशिपचा हेतू आहे. फेलोशिप मिळवण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग आणि मॅथेमॅटिक्स (स्टेम) विषयातील पूर्ण-वेळ पीएचडीशी संबंधित असणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी serbonline.in या वेबसाईटला भेट देऊ शकता.

एसटी विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप –

आदिवासी विकास मंत्रालयामार्फत नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप योजना चालवली जाते. दरवर्षी 20 विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षण, पीएचडी आणि पोस्ट-डॉक्टरल अभ्यासक्रमांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्याला परदेशात शिक्षण घ्याचची इच्छा असेल तर त्याला सरकारच्यावतीनं यासाठी आर्थिक मदत केली जाते. यासाठी overseas.tribal.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल.

परदेशात उच्च शिक्षण घ्यायची इच्छा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि इतर काही मंत्रालये आर्थिक मदत देतात. त्यासाठी वरील प्रकारच्या शिष्यवृत्ती दिल्या जातात. शिक्षण मंत्रालयाच्या education.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देखील या शिष्यवृत्तींबाबत माहिती मिळेल.

बातमी शेअर करा !
Share
Tags: indian government scholarshipsscholarship for indian studentsstudy aboradstudy abroad for indian students

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू; प्रवाशांची सुरक्षितता, चालकांचे हित आणि मराठी युवक-युवतींसाठी रोजगाराच्या नव्या संधी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

July 17, 2026
सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 17, 2026
Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

Crime News: भडगावातील बॅग हिसकावून चोरी प्रकरणाचा उलगडा; जळगाव एलसीबीने पाच आरोपींना केली अटक

July 17, 2026
Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Pachora News: पाचोऱ्यात ‘हिरकणी कक्षाचे’ नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

July 16, 2026
जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

जळगाव एलसीबीची मोठी कारवाई! धावत्या लक्झरी बसमधील २५ लाखांची चोरी उघड; चौघांना अटक

July 16, 2026
जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

जळगावात महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत एक दिवसीय उद्योजकता जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

July 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page