कापूस हे महाराष्ट्रातील – विशेषतः जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील – शेतकऱ्यांचं महत्त्वाचं नगदी पीक आहे. यामुळे कापूस हे पीक शेतकर्यांच्या उत्पन्नाचा प्रमुख आधार मानला जाते. कोरडवाहू आणि बागायती अशा दोन्ही प्रकारात कापसाची लागवड करण्यात येते. दरम्यान, यंदा खरीप हंगीम सध्यास्थितीत चांगला असताना कापूस लागवड झाल्यानंतरच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर शेतकऱ्यांनी नेमकं काय केले पाहिजे, याबाबत शेतीतज्ज्ञ सुनिल पाटील यांनी शेतकऱ्यांना महत्वाचे मार्गदर्शन केलंय.