भुसावळ : रेल्वेने प्रवास करणाऱ्या खान्देशातील प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भुसावळ रेल्वे विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर/मेमू विशेष गाड्या आता नियमित क्रमांकासह चालवल्या जाणार आहेत. तसेच या बदलाची अंमलबजावणी येत्या 1 जानेवारी 2025 पासून होणार आहे.
चाळीसगाव – धुळे सेक्शन
1) ट्रेन क्रमांक 01303 : चाळीसगाव – धुळे विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61131 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
2) ट्रेन क्रमांक 01304 : धुळे – चाळीसगाव विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61132 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
3) ट्रेन क्रमांक 01307 चाळीसगाव – धुळे विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61133 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
4) ट्रेन क्रमांक 01308 : धुळे – चाळीसगाव विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61134 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
5) ट्रेन क्रमांक 01309 : चाळीसगाव – धुळे विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61135 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
6) ट्रेन क्रमांक 01310 : धुळे – चाळीसगाव विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61136 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
7) ट्रेन क्रमांक 01313 चाळीसगाव – धुळे विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61137 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
8) ट्रेन क्रमांक 01314 धुळे – चाळीसगाव विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61138 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
नांदेड – मनमाड सेक्शन
1) ट्रेन क्रमांक 07777 : नांदेड – मनमाड विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 57651 क्रमांकाने नियमित डेमू ट्रेन म्हणून धावेल.
2) ट्रेन क्रमांक 07778 : मनमाड – नांदेड विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 57652 क्रमांकाने नियमित डेमू ट्रेन म्हणून धावेल.
भुसावळ – बडनेरा सेक्शन
1) ट्रेन क्रमांक 01365 : भुसावळ – बडनेरा विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61101 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
2) ट्रेन क्रमांक 01366 : बडनेरा – भुसावळ विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 61102 मेमू ट्रेन म्हणून धावेल.
भुसावळ-नंदुरबार सेक्शन
1) ट्रेन क्रमांक 09078 भुसावळ-नंदुरबार विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 59076 क्रमांकाने नियमित ट्रेन म्हणून धावेल.
2) ट्रेन क्रमांक 09077 नंदुरबार-भुसावळ विशेष गाडी आता नियमित ट्रेन क्रमांक 59075 क्रमांकाने नियमित ट्रेन म्हणून धावेल.
याचबरोबर खंडवा -बीर सेक्शनमधील 5, बडनेरा नरखेड सेक्शनमधील 4, अमरावती- वर्धा सेक्शन मधील 2 तर बडनेरा- अमरावती सेक्शन मधील 6 गाड्यांचे देखील क्रमांक नियमित केले आहे. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.