नाशिक, 5 जानेवारी : आता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरातील वनस्पती, वृक्षांची क्युआर कोडव्दारे माहिती मिळणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार करण्यात आलेले क्युआर कोडव्दारा सर्वसामान्यांना वनस्पतींचे औषधी महत्व व माहिती मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात विविध प्रकाराचे वनस्पती, वृक्षांची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
सदर वृक्षांना जीओ टॅगींग व क्युआर कोड लेबल लावण्यात आले आहे. या उपक्रमाचा शुभारंभ विद्यापीठाच्या कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त लेफ्टनन्ट जनरल डॉ. राजीव कानिटकर, मा. प्रति-कुलगुरु, डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी अधिकारी उपस्थित होते.
विद्यापीठाचा जीओटॅगींग व क्युआर कोड उपक्रम –
विद्यापीठ परिसरास भेट देणारे अभ्यागत, विद्यार्थ्यांना वनसंपदेची माहिती होण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. याअनुषंगाने क्युआर कोड तयार करण्यात आले आहेत. स्मार्ट फोनव्दारा क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर वनस्पती, वृक्षाची जीओ टॅगींगव्दारे स्थान, वनस्पतीचे शास्त्रीय नांव, मराठी नांव, परिसरातील वनस्पतींची संख्या, औषधी महत्व आदी माहिती उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी व अभ्यागतांना वनस्पतींचे औषधी महत्व समजेल. पर्यावरण संवर्धनाबरोबर वनस्पतींची ओळख व माहिती होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाचा जीओटॅगींग व क्युआर कोड उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे.
विद्यापीठाचे ग्रीन कॅम्पस उपक्रमांतर्गत परिसरात विविध प्रकारातील फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती आदींची मोठया प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. वनस्पती व वृक्षांची ओळख व माहिती सर्वांना व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यापीठ परिसारात व संलग्नित महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. वृक्षलागवडीबरोबर त्यांची माहिती सर्वांना असणे गरजेचे आहे. क्युआर कोडच्या माध्यतातून वनस्पतींचे महत्व व माहिती देण्याचा प्रयत्न विद्यापीठाने केला आहे
याप्रसंगी हर्बल गार्डनच्या देखभाल करणारे नंदु सोनजे, संतोष केदार यांचा कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ब्रिग.डॉ. सुबोध मुळगुंद, श्रीधर चितळे, डॉ. उदयसिंह रावराणे, संजय मराठे, अॅड. संदीप कुलकर्णी, वाय.जी.पाटील, डॉ. स्वप्नील तोरणे, संदीप राठोड, महेश बिरारीस, निलेश ओहळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. क्युआर कोडसंदर्भात डॉ. प्रदीप आवळे, श्री. रत्नाकर काळे यांनी कार्यवाही केली आहे.
विद्यापीठास बजाज इलेक्ट्रिकल फांऊन्डेशनकडून सहा हजार दोनशे रोपे प्राप्त
विद्यापीठ परिसारातील ‘हर्बल गार्डन’ मध्ये विविध प्रकारचे वनस्पती व वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. याकरीता विद्यापीठास सहा हजार दोनशे रोपे मे. बजाज इलेक्ट्रिकल फांऊन्डेशन यांच्याकडून कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सब्लिटी (सी.एस.आर.) व्दारा प्राप्त झाली आहेत. यामध्ये पेरु, जांभूळ, कांचन, बकुळ, चिकु, आवळा, अर्जुन, सिताफळ, करंज, सप्तपर्णी, फणस, बदाम, चित्रक, कुपी आदी विविध प्रकारातील रोपांचा समावेश आहे.
विद्यापीठात लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची मे. बजाज इलेक्ट्रिकल फांऊन्डेशनचे पदाधिकारी यांनी नुकतीच पहाणी केली. विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवकांच्या मदतीने परिसारात वृक्षारोपण करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्षांचे संवर्धन व जतन करण्याचा संदेश विद्यापीठाकडून सर्वांना देण्यात येत आहे. अशी माहिती हरित कक्षाचे प्रमुख उपकुलसचिव डॉ. सुनील फुगारे यांनी दिली.