• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

रानभाज्यांमध्ये मानवी आरोग्याला आवश्यक औषधी गुणधर्म – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद, 20 प्रकारच्या रानभाज्यांची विक्री

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 13, 2023
in जळगाव शहर
रानभाजी महोत्सवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे आणि इतर मान्यवर.

रानभाजी महोत्सवात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार सुरेश भोळे आणि इतर मान्यवर.

जळगांव, 13 ऑगस्ट : आपल्या संस्कृती, परंपरेतून आलेल्या भाज्या म्हणून आपण रानभाज्यांना ओळखतो. मानवी आरोग्याला आवश्यक असणारी खनिजे, महत्त्वाची अन्नद्रव्ये व अनेक औषधी गुणधर्म फक्त रानभाज्यांमध्ये आढळून येतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले.

प्रकल्प संचालक (आत्मा),  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी प्रसाद यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.संभाजी ठाकूर, आत्माचे प्रकल्प संचालक पांडुरंग साळवे, रोटरीचे सरिता खाचणे, मुनीरा  तरवारी, योगेश भोळे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यावेळी म्हणाले, निसर्गाकडून भरभरून मिळणाऱ्या रानभाज्यांचे जतन व संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. इतर फास्ट फूडपेक्षा प्रत्येक शासकीय कार्यक्रम, बैठकांमध्ये रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ असणे आवश्यक आहे. केळीवरील कुंकंबर मोझॅक, करपा आदी रोगांवर करायचा उपाययोजना व व्यवस्थापन याबाबत जाणीव जागृती करणाऱ्या पोस्टरचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

यावेळी‌ जिल्हाधिकाऱ्यांनी रानभाजी अंबाडी पासून बनवलेले पराठे, फांगची भजी, मशरूमचा वडा आदी अस्सल गावरान पदार्थांचा आस्वाद घेतला. महिला बचतगटांच्या सदस्यांशी त्यांनी संवाद ही साधला.

ह्या रानभाज्या ठरल्या आकर्षण –

मायादेवी नगर‌ येथील रोटरी क्लब येथे आयोजित या रानभाजी महोत्सवास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटनापूर्वीच रानभाज्या खरेदीसाठी लोकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती.

नागरिकांनी रानभाज्या खरेदीसाठी गर्दी केली होती. उद्घाटनापर्यंत विक्रेत्यांच्या 25 टक्के मालाची विक्रीही झाली होती. दुपारी 3 वाजेपर्यंत महोत्सवात संपूर्ण भाजीपाला संपलेला होता. महोत्सवात करटोली, फांग, बांबूचे कंद, केळीचे फूल‌ या रानभाज्या आकर्षण ठरल्या. रानमेथी , गुडवेल, म्हशोला, काया कळूची साल, अर्जुन सारळ्या, कळसागाची पाला, जंगली कांदा, ओवा, दूधी शेंग, मिस्वाक लकडी, शतावरी, चाकवत, काटेमाठ, कुरडू, तरोटा यासह इतर विविध 20 पेक्षा अधिक रानभाज्यांचा समावेश महोत्सवात होता.

चोपडा येथील चक्रधर महिला बचतगट, एंजल महिला बचतगट, धरणगाव येथील ओम शांती स्वयंसहाय्यता बचतगटांच्या महिलांनी रानभाज्यांपासून बनवलेले पदार्थ ही महोत्सवात विक्रीसाठी ठेवले होते‌. या महोत्सवाच्या यशस्वितेसाठी श्रीकांत झांबरे, देविदास कोल्हे तसेच सर्व तालुक्यातील सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon collector ayush prasadjalgaon district collectorjalgaon newsjalgaon ranbhaji mahotsavranbhaji mahotsav jalgaon 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

जाहिरातीतून एसटी कमविणार 250 कोटी रुपये; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

March 3, 2026
भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

भारत-पाक सीमेवरील पुंछ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार

March 3, 2026
चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page