मुंबई, 4 जुलै : टीम इंडियाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपुर्ण भारतवासियांना भारतीय संघांची असलेली प्रतिक्षा अखेर आज संपली. भारतीय क्रिकेट संघ आज संध्याकाळी 6 वाजता मुंबईत दाखल झाला. यानंतर मरीन ड्राईव्हपासून विजयी मिरवणुकीला सुरूवात झाली.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणुकीचे आज मुंबईत आयोजन करण्यात आले. यासाठी दुपारी 4 वाजेपासूनच क्रिकेट चाहत्यांच्या गर्दी जमायला सुरूवात झाली. जसजसा वेळ पुढे जाऊ लागला तसेतसे गर्दी वाढू लागली. अक्षरशः कधीही कुणासाठी न थांबलेली मुंबई आज टीम इंडियाच्या स्वागतासाठी थांबल्यासारखी वाट होती. लाखोंच्या संख्येने क्रिकेट चाहते मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झाले होते. तसेच वानखेडे स्टेडियममध्ये देखील अनेक चाहते टीम इंडियाच्या आधीच त्याठिकाणी पोहचले होते.संध्याकाळी टीम इंडियाच्या विजयी रॅलीस सुरूवात झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह रोडवर जनसागर लोटला होता. टीम इंडियाचे स्वागत करताना चाहत्यांच्या अभूतपुर्व आनंद दिसून येत होता. दरम्यान, या विजयी रॅलीत कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलीस तसेच महापालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणात खबरदारी घेत अचूक नियोजन केले होते.
यानंतर टीम इंडियातील खेळाडूंनी आपले मनोगत व्यक्त करत आनंद साजरा केला.रोहित शर्मासह टीम इंडियाच्या खेळाडुंनी लाखो चाहत्यांना विश्वचषक दाखवत आभार मानले.
यावेळी बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रूपयांच्या बक्षीसाचे वितरण करण्यात आले.
हेही वाचा : Breaking : टीम इंडियाचे मुंबईत आगमन, मरीन ड्राईव्हवर चाहत्यांची भरपुर गर्दी