धुळे, 10 डिसेंबर : आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली (रजि. भारत सरकार) या संघटनेकडून धुळे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप मोहिते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शशिकांत दुसाने उपस्थित होते. यावेळी धुळे लोक न्यायालयाचे न्यायाधीश संदीप स्वामी साहेब आणि संघटनेचे महाराष्ट्र राज्य सल्लागार अॅड. राहुल वाघ यांनी मानव अधिकार या विषयावर आपले विचार मांडत मार्गदर्शन केले. धुळे जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.
तसेच या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा पुनम खैरनार, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा शोभा आखाडे आणि संघटनेचे धुळे जिल्ह्यातील संपूर्ण पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. धुळे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण आणि धुळे जिल्हा संघटना यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम केले.