• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

शेतकऱ्याकडून लाच घेणं भोवलं; जळगाव एसीबीकडून कृषी उपअधिकाऱ्यासह तीन जणांना अटक, पाचोरा तालुक्यातील घटना नेमकी काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 3, 2026
in पाचोरा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
शेतकऱ्याकडून लाच घेणं भोवलं; जळगाव एसीबीकडून कृषी उपअधिकाऱ्यासह तीन जणांना अटक, पाचोरा तालुक्यातील घटना नेमकी काय?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 3 फेब्रुवारी : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पाचोरा तालुक्यातून लाचप्रकरणाची बातमी समोर आली आहे. नांगर व रोटर खरेदीसाठीचे अनुदान मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाचोरा येथील कृषी उपअधिकारी लिलाधर शिवाजीराव देशमुख याच्यासह त्याचा पंटर आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली. या प्रकरणात संजय प्रभाकर पाटील व नितीन इंदलसिंग निकम (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) अशी अटक करण्यात आलेल्या इतर दोघांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुळ तक्रारदार हे पाचोरा तालुक्यातील जोगेवडगाव येथील असून ते परिवारासह गावात राहतात. तक्रारदार यांनी शासन योजनेअंतर्गत शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत सबसीडी मिळत असल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी करून सबसीडी मिळण्यासाठी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज केला होता.

शेतकऱ्याकडे मागितली लाच –

सदर कार्यालयाकडुन नमुद साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी केले होते. सदर खरेदी केलेल्या साहित्याचा कृषी उप अधिकारी, कृषी कार्यालय, पाचोरा विभाग, जळगाव यांचेसोबत फोटो काढुन ते योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवुन देण्यासाठी लिलाधर देशमुख, कृषी उप अधिकारी, पाचोरा यांनी तक्रारदार यांचेकडे ६,०००/- रूपये लाच मागणी करून नमुद लाच रक्कम ही संजय पाटील, धनदाई कृषी केंद्र, आंबेवडगाव यांचेकडे देणेबाबत सांगितले होते.

दरम्यान, त्याबाबत तक्रारदार यांनी त्यांचे विरूध्द आज दि.०२/०२/२०२६ रोजी लाप्रवि जळगाव घटकाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज दि.०२/०२/२०२६ रोजी पंचांचे समक्ष पडताळणी केली असता लिलाधर देशमुख यांनी कामाचे फोटो काढुन ते योजनेच्या वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवुन देण्यासाठी यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष ६,०००/- रूपये लाच मागणी करून तडजोड अंती ५,०००/- स्विकारण्याचे मान्य करून ते खाजगी पंटर संजय पाटील, धनदाई कृषी केंद्र, आंबेवडगाव यांचेकडे देण्यास सांगितले.

दरम्यान, लिलाधर देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदार हे सदर लाच रक्कम संजय पाटील यांना देण्यासाठी त्यांचे धनदाई कृषी केंद्र, आंबेवडगाव येथे गेले असता ते दुकानावर नसल्याने आलोसे देशमुख यांचे सांगणे प्रमाणे सदर लाच रक्कम ही दुकानावर हजर असलेले नितीन निकम यांना सदरची रक्कम लाचेची असल्याचे जाणीव असतांनाही त्यांनी लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली. यामुळे या लाचप्रकरणात लिलाधर देशमुख, आरोपी खाजगी इसम संजय पाटील व नितीन निकम यांचेविरूध्द पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई –

सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, सापळा पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, प्रदीप पोळ, राकेश दुसाने यांनी यशस्वी केली.

हेही वाचा : जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत तब्बल ‘इतक्या’ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी

बातमी शेअर करा !
Share
Tags: bribe casejalgaon acbpachora latest newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page