• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

पारोळ्यात सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात; नेमकं प्रकरण काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 3, 2025
in पारोळा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
पारोळ्यात सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी दोन वनपालांनी घेतली लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात; नेमकं प्रकरण काय?

पारोळा, 3 जुलै : जळगाव जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना लाचलुचपत विभागाने पारोळ्यात लाचप्रकरणी मोठी कारवाई केलीय. सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी 8 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोन वनपालांना काल बुधवार 2 जुलै रोजी रंगेहात पकडले. यामध्ये एका महिला वनपालाचा देखील समावेश आहे.  दिलीप भाईदास पाटील (वय 52, रा. मोंढाळा ता. पारोळा) आणि वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड (वय 38 रा. चोरवड ता. पारोळा) अशी लाच घेणाऱ्यांची नावे आहेत.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शेतात लागवड केलेल्या सागाच्या झाडांची शेतमालकाकडून खरेदी करण्याचा व्यापार करतात. तक्रारदार यांनी पारोळा तालुक्यातील इंधवे शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या सागाचे झाडे तोडण्याचा शेतकरी व तक्रारदार यांच्यात साठ हजार रुपयांचा सौदा झालेला होता.‌ त्यानुसार सदर शेतकरी यांनी उपवन विभाग पारोळा येथून सागाची झाडे तोडण्याची परवानगी मिळण्यासाठी सदर शेतकऱ्यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले होते.

सागाची झाडे तोडण्याच्या परवानगीसाठी लाचेची मागणी –

त्यानुसार सागाची झाडे तोडण्याची परवानगी देण्यासाठी वनपाल दिलीप भाईदास पाटील यांनी तक्रारदाराकडे आठ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याप्रकरणी जळगाव लाचलुचपत विभागाकडे 19 जून रोजी तक्रार प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे दिनांक 19 जून रोजी पडताळणी केली असता वनपाल दिलीप भाईदास पाटील यांनी 8000 ची मागणी करुन लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

एसीबीने पकडले रंगेहात –

दरम्यान, जळगाव लाचलुचपत विभागाने सापळा रचत काल बुधावारी दुपारी चार वाजेच्या सुमारास तक्रारदार यांच्याकडून वनपाल दिलीप भाईदास पाटील यांच्या सांगण्यावरून महिला वनपाल  वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड यांनी पंचासमक्ष 8000/-रुपये स्वीकारताना रंगेहात सापडले. याप्रकरणी दोघं वनपालांना ताब्यात घेण्यात आले असून मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच महिला वनपाल वैशाली गायकवाड यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.


एसबीच्या पथकाने केली कारवाई –

याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम प्र अधि . 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या आदेशानुसार सफौ. सुरेश पाटील, मपोहेकॉ. शैला धनगर, पोहेकॉ. किशोर महाजन,  पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केलीय.

हेही वाचा : मोठी बातमी!, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे?, शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार?, सर्वोच्च न्यायालयात ‘या’ तारखेला होणार सुनावणी

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon acbparola bribe caseparola newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page