• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 26, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ‘या’ कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

जळगाव, 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) सन 2024-25 मध्ये अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जाती व अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांना सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेणेसाठी दिनांक 25 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर 2024 या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज मागविण्या करीता मोहीम राबविण्यात येत आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –
राष्ट्रीय कृषि विकास योजना प्रति थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक यांना 55 टक्के व बहुभूधारक यांना 45 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजने अंतर्गत अतिरिक्त 25 टक्के व 30 टक्के पुरक अनुदान देणेबाबत तरतुद करण्यात आलेली आहे. अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती या प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजने अंतर्गत पुरक अनुदान देय असल्याने पात्र शेतकऱ्यांना मंजुर मापदंडाच्या 90 टक्के च्या मर्यादेत अनुदान देण्यात येते.

25 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर या कालवधीत विशेष मोहीम –
सन 2024-25 मध्ये नाशिक विभागासाठी अनुसुचित जाती प्रवर्गाकरिता रक्कम रु. 485 लाख व अनुसुचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना लाभ देणेकरीता रक्कम रु. 1856 लाख निधी जिल्हास्तरावर उपलब्ध आहे. अर्ज नोंदणी करण्यासाठी दिनांक 25 ऑक्टोबर ते 10 डिसेंबर या कालवधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अनु. जाती व अनु. जमातीच्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या कालवधीत महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे. अर्ज करतांना अचूक माहिती भरावी जेणेकरून अर्ज रद्द होणार नाही. जास्तीत जास्त शेतकरी यांनी अर्ज नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुभाष काटकर यांनी केलेले आहे.

अर्ज करतांना मालकीचा 7/12, 8अ, आधार कार्ड व बँक पासबुक सोबत असणे आवश्यक आहे. याकरिता आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण करणे बंधनकारक असणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असावी व त्याची नोंद 7/12 उताऱ्यावर असावी, नोंद नसल्यास विहीर, शेततळे इ.बाबत स्वंय घोषणापत्र देण्यात यावे. योजनेचा लाभ 5 हेक्टर पर्यंत देण्यात येणार आहे. अर्जाची महाडीबीटी पोर्टलवर संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे व निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांना लघु संदेशाद्वारे त्यांची माहिती देण्यात येणार आहे.

पूर्वसंमती मिळाल्यानंतर नोंदणीकृत कंपनीचे अधिकृत वितरकांकडून संच खरेदी करता येईल. संच बसविल्यानंतर कृषि पर्यवेक्षकामार्फत मोका तपासणी होऊन शेतकरी यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व सामान्य सेवा केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन नाशिक विभागाचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

हेही वाचा : Kishor Appa Patil Hattrick : ऐतिहासिक विजयानंतर आमदार किशोर आप्पा पाटील काय म्हणाले? पहिलीच मुलाखत..

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon administrationjalgaon district latest newsmahadbt portalmarathi newsmicro irrigation schemesuvarna khandesh live news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page