जळगाव, 4 फेब्रुवारी : आयपीएस अधिकारी एम. राजकुमार यांची जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक पदावरून बदली करण्यात आल्यानंतर आयपीएस अधिकारी एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी आज 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.
काय आहे संपूर्ण बातमी? –
जळगाव जिल्ह्याचे मावळते पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या बदलीचे आदेश दिनांक 31 जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. एम. राजकुमार यांच्या जागी बृहन्मुंबई येथे पोलीस उपायुक्त असलेले एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांची नियुक्ती आदेश शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काढले होते. तसेच एम. राजकुमार यांना सोलापूर शहर पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीवर बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
नूतन एसपींनी पदभार स्विकरला –
दरम्यान, जळगाव जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी यांनी आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी एम. राजकुमार यांच्याकडून पदाचा पदभार स्वीकारला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
हेहा वाचा : मराठी साहित्य संमेलनाचा समारोप, अमळनेरला पुस्तकाचे गाव करणार, मंत्री दीपक केसरकरांची घोषणा