पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत “महसूल अधिकारी नियमपुस्तिका” या नवोन्मेषी दस्तऐवजाचे अनावरण करण्यात आले. ही नियमपुस्तिका विभागीय आयुक्त कोकण विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने तयार केली असून या समितीमध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे सदस्य आहेत.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेशकुमार, राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि अपर जिल्हाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या कार्यशाळेत “महसूल अधिकारी नियमपुस्तिका” या नवोन्मेषी दस्तऐवजाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या पुस्तिकेच्या माध्यमातून महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यातील अचूकता, एकसंधता आणि कार्यक्षमता यामध्ये भरीव मदत होणार आहे.
नियमपुस्तिका तयार करणाऱ्या टीममध्ये विशेष सहभाग:
अंकुश पिनाटे – अपर जिल्हाधिकारी
विजयकुमार ढगे – उपजिल्हाधिकारी (महसूल)
बबन काकडे – प्रांताधिकारी, फैजपूर
मनीषकुमार गायकवाड – प्रांताधिकारी, एरंडोल
विजय सूर्यवंशी – तहसीलदार, कुळकायदा
मोहनमाला नाझीरकर – तहसीलदार, यावल
ज्योती गुंजाळ – तहसीलदार, महसूल
विजय बनसोड – तहसीलदार, पाचोरा
महेश पत्की – DIO, NIC, जळगाव
मिलींद बुवा – स्वीय सहाय्यक, जिल्हाधिकारी जळगाव तसेच किशोर कुलकर्णी (स्वीय सहाय्यक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही नियमपुस्तिका राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांसाठी प्रभावी मार्गदर्शक ठरणार आहे.