जळगाव, 20 मे : घरकूलसाठी गाव पातळीवरील सर्वेक्षण सध्या सुरू असून, यापूर्वी त्याची अंतिम तारीख 15 मे होती. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वेक्षणास मुदतवाढ देण्यात आली असून प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र लाभार्थ्यांची नोंद निश्चितपणे व वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी केले आहे.
सीईओ मिनल करनावाल काय म्हणाल्या? –
मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल म्हणाल्या की, जळगाव जिल्ह्यात सध्या पीएम आवास योजनेअंतर्गत घरकूलसंदर्भात सर्वेक्षण सुरू आहे. त्यामध्ये स्वतः किंवा ग्रामसेवकांमार्फत सर्वेक्षण करून घेणं सोयीचे आहे. घरकूल सर्वेक्षणाची अंतिम मुदत ही 15 मे पर्यंत होती. मात्र, यामध्ये मुदतवाढ करण्यात आली असून 31 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे जे कुणी यामध्ये सर्वेक्षणापासून करण्यापासून राहिले असतील तर त्यांनी सर्वेक्षण करून घ्यावी. सरपंचानी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे.
घरकूलांसाठी वेळेत सर्वेक्षण पुर्ण करून घेण्याचे आवाहन –
दरम्यान, घरकुलांसाठीचे सर्वेक्षण नऊ वर्षांनंतर होत आहे आणि यापुढे जे घरकुलांबाबत जे उद्दिष्ट येतील त्यासाठी हीच यादी राहणार आहे. यामुळे सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना यांनी पुढाकार घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेस पात्र लाभार्थ्यांची नोंद निश्चितपणे व वेळेत पूर्ण करूण घ्यावीत, असे आवाहन मिनल करनवाल यांनी केले आहे. तसेच ही योजना गोरगरीब व घर नसलेल्या कुटुंबांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी तत्परता दाखवावी, असेही त्या म्हणाल्या आहेत.