• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video | एरंडोल खून प्रकरण | ‘धक्का लागला म्हणून हत्या’; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 19, 2025
in जळगाव जिल्हा, एरंडोल, क्राईम, ताज्या बातम्या
Video | एरंडोल खून प्रकरण | ‘धक्का लागला म्हणून हत्या’; पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी नेमकं काय म्हणाले?

जळगाव, 19 जून : एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील 13 वर्षीय तेजस महाजन याच्या खूनप्रकरणाने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना तेजसचा त्यांना धक्का लागला. मात्र केवळ धक्का लागला म्हणून तिन्ही आरोपींना तेजसला मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर चाकूने गळा चिरून त्याची हत्या केल्याचे पोलीस तपासातून उघड झाले आहे.

नेमकं काय प्रकरण? –

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील 13 वर्षीय तेजस महाजन हा त्यांच्या दुकानावर असताना सायंकाळपर्यंत घरी परतला नाही. यानंतर सायंकाळी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. याप्रकरणी एरंडोल पोलिसांत हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी खर्ची गावालतच्या शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला. तेजसची हत्या ही नरबळी असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, आता याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेने सदर गुन्हा उघडकीस आणलाय.

‘धक्का लागल्याने हत्या’ –

तेजस खून हत्याप्रकरणात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हरदास डेमशा वास्कले (वय 35 रा. नांदीया, ता. भगवानपुरा, जि. खरगोन) आणि सुरेश नकल्या खरते (वय 34 रा. धोपा, ता. झिरण्या, जि. खरगोन) अशी त्यांची नावे आहेत. तसेच एक आरोपी अद्याप फरार असून रिचडिया तुकाराम कटोले (वय 20 रा. नांदीया, ता. भगवानपूरा) असे त्याचे नाव आहे. दरम्यान, तिन्ही आरोपी दारूच्या नशेत असताना तेजसचा त्यांना धक्का लागला. मात्र, केवळ धक्का लागला म्हणून तिन्ही आरोपींना तेजसला मारहाण करत त्याची चाकूने गळा चिरून हत्या केलीय.

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक काय म्हणाले? –

जळगावचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले की, तीनही आरोपी हे रिंगणगाव परिसरात मध्य प्रदेशातून कामानिमित्त आले होते. खून प्रकरणानंतर ते गावात नसल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला. दरम्यान, एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असता त्याने सदर हत्येप्रकरणी कबुली देत दोन आरोपींची नावे सांगितली. त्या दोन आरोपींपैकी एकास अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


रिंगणगाव हत्या प्रकरणातील तीनही आरोपी 16 जून रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत होते. असे असताना तेजसचा आरोपींना धक्का लागल्याने त्यांच्यात वाद झाला. यानंतर तीनही आरोपींनी त्या मुलास मारहाण केली. तसेच एकाने गळा चिरून हत्या केली. आरोपींनी सदर मृतदेह गावाच्या शेजारी फेकला आणि घटनास्थळावरून पसार झाले. दरम्यान, तेजस हत्याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात असल्याची माहिती एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिलीय.


नरबळीचा संशय –

तेजसच्या हत्येप्रकरणी त्याचे वडील गजानन महाजन यांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवदेन दिलंय. माझ्या मुलाची हत्या नरबळीच असल्याचे सांगत न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी एसपींकडे केलीय. तर दुसरीकडे ही हत्या नरबळीतून झालेली नसल्याचे आतापर्यंतच्या पोलीस तपासातून समोर आल्याचे एसपी डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितलंय.

हेही वाचा : ‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: erandol crime newsjalgaon sp dr maheshwar reddyringangoan murder casesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात 1 हजार 440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती; सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

August 17, 2026
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत मोहमांडली येथे सर्वसमावेशक आरोग्य सेवा

August 16, 2026
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक – आमदार किशोर आप्पा पाटील

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून प्रेरणा घेऊन सक्षम व विकसित राष्ट्र घडविण्याचा संकल्प आवश्यक – आमदार किशोर आप्पा पाटील

August 16, 2026
निमड्या येथे आजीविका रोजगार मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पहिला वृक्षलागवड प्रयोग; 3 हजार 760 वृक्षांची लागवड

निमड्या येथे आजीविका रोजगार मिशनअंतर्गत जिल्ह्यातील पहिला वृक्षलागवड प्रयोग; 3 हजार 760 वृक्षांची लागवड

August 16, 2026
‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात लवकरच झळकणार

‘मिशन पँथर 1970’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित; पाच भाषांमध्ये संपूर्ण भारतात लवकरच झळकणार

August 16, 2026
राज्यातील 124 आरोग्य संस्थांचे उद्घाटन; सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील 124 आरोग्य संस्थांचे उद्घाटन; सामान्य नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा देणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page