• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home एरंडोल

Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 18, 2025
in एरंडोल, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Video | एरंडोलमध्ये अल्पवयीन मुलाची हत्या, नरबळीचा आरोप; जळगावचे एसपींनी दिली महत्वाची माहिती

एरंडोल, 17 जून : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे एका 13 वर्षीय मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यानंतर आज एरंडोलमध्ये मुलाच्या हत्येप्रकरणी आम्हाला न्याय हवा आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत महिलांनी रस्ता रोको आंदोलन केले. तसेच नरबळीसाठी अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याचा संशय हा व्यक्त केला जातोय. दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणावर महत्वाची माहिती दिली आहे.

नेमकं प्रकरण काय? –

मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात रिंगणगाव येथे गजानन महाजन यांचे हार्डवेअर साहित्य विक्रीचे दुकान आहे. दरम्यान, काल सोमवार 16 जून रोजी गजानन महाजन हे जळगावला कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांनी त्यांचा मुलगा तेजस यास दुकानात थांबण्यास सांगितले होते. तेजस दुपारपर्यंत दुकानावर थांबला. मात्र, दुकान बंद केल्यानंतर तो घरी पोहोचलाच नाही. यानंतर राजेशचा कुटुंबियांकडून सर्वत्र शोध घेण्यात आला. यानंतर एरंडोल पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली.

….अन् राजेशचा मृतदेह आढळला –

एरंडोल पोलिसांना तपासाला वेग देत तेजसचा शोध घेण्यास सुरूवात केली. यानंतर आज सकाळी एरंडोल तालुक्यातील खर्ची गावालगतच्या शिवारात तेजसचा गळा चिरलेल्या अवस्थेत मृतहेह आढळून आला. दरम्यान, महाजन कुटुंबियांना बरोबर घेत पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी गाठले असता मृतदेह तेजस याचाच असल्याची खात्री पटली.

अल्पवयीन मुलाच्या हत्येप्रकरणी घटनास्थळी न्यायवैद्यक पथकला पाचारण करण्यात आले. याठिकाणी श्वान पथकाद्वारे देखील शोध घेण्यात आला. यानंतर पोलिसांनी पंचनामा पूर्ण करत मृतदेह पुढील तपासणीसाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. आज जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासासाठी महत्वपुर्ण सूचना केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


जळगावचे एसपी काय म्हणाले? –

जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना सांगितले की, रिंगणगावातून 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा हरविल्याची तक्रार एरंडोल पोलिसात प्राप्त झाली होती. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळी 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या गळ्यावरती जखम असल्याचे आढळून आले. दरम्यान, मुलाचा मृतहेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला असून नेमका खून कोणी केला याबाबत पुढील तपास सुरू आहे.

ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन –

रिंगणगावात 13 वर्षीय अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर महिलांसह ग्रामस्थांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांनी संतप्त होत “आमच्या बाळाला न्याय हवा; गुन्हेगाराला फाशी द्या” , अशी मागणी केली. यावेळी महिलांचा मोठ्या प्रमाणात आक्रोश पाहायला मिळाला.


हेही वाचा : ‘राज्यात ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार!’ आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील निर्णय वाचा एका क्लिकवर

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: erandol murder newserandol taluka crime newsjalgaon sp dr maheshwar reddysuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

“अजित दादा आपल्यात नाहीत; ही वस्तुस्थिती, पण….!”, आमदार रोहित पवारांची खळबळजनक प्रेस, घातपाताची शक्यता असलेली सांगितली ‘ही’ कारणं

February 10, 2026
Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला  उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

Video | सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार; पार्थ पवार यांना अश्रू अनावर

February 10, 2026
महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

February 10, 2026
मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोठी बातमी! राज्यात 70 हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती, नव्या पद्धतीने भरती होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

February 10, 2026
दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे आवाहन; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विद्यार्थ्यांना संदेश

February 9, 2026
Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

Video | दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानासाठी प्रशासन सज्ज; विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – जिल्हाधिकारी रोहन घुगे

February 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page