जळगाव, 5 सप्टेंबर : जळगाव जिल्हा परिषदेच्यावतीने शिक्षकांना दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदा प्रत्येक तालुक्यातून एक अशा शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या 15 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.
ग्रामविकास विभागाच्या वतीने शिक्षण क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार 2023-24 या वर्षासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यामध्ये 23 प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झाले.
जिल्हा पुरस्कार समितीने प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी सर्व शिक्षकांच्या मुलाखती घेत 15 शिक्षकांच्या प्रस्तावास विभागीय आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठवले होते. दरम्यान, विभागीय आयुक्तांनी या प्रस्तावास मान्याता दिल्याने 15 शिक्षकांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे –
जिल्हा परिषदेकडून सन 2023-24 मधील पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे पुढीलप्रमाणे –
- गजानन चौधरी (जि.प. शाळा ढेकुसिम ता. अमळनेर)
- गणेश व्यंकटराव पाटील (जि.प.शाळा, अंधळगाव)
- महेंद्रसिंग पाटील (जि.प. शाळा नाडगाव, ता.बोदवड)
- रिजवानखानअजमलखान (जि.प.उर्दु शाळा कुऱ्हे ता. भुसावळ)
- किशोर पाटील (जि.प.शाळा देवगाव ता.चोपडा)
- शुभांगी सोनवणे (जि.प.शाळा न्हावे ता. चाळीसगाव)
- विजय बागुल (जि.प.शाळा वराड बु. ता.धरणगाव)
- गणेश महाजन (जि.प.शाळा टाकरखेडा ता. एरंडोल)
- ज्योती तडके (जि.प.शाळा नांद्रे बु. ता.जळगाव)
- कैलास पाटील (जि.प.शाळा सोनारी ता.जामनेर)
- धनलाल भोई (जि.प. केंद्रीय शाळा नं.1 मुक्ताईनगर)
- विजया भालचंद्र पाटील (जि.प.केंद्रीय शाळा बाळद ता.पाचोरा)
- अलका चौधरी (जि.प.शाळा बोळे ता.पारोळा)
- जितेंद्र गवळी (जि.प.शाळा पुनखेडा ता. रावेर)
- अतुल रमेश चौधरी (जि.प.मराठी मुलांची शाळा सांगवी बु. ता. यावल)