• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी सीईओ करिश्मा नायर यांच्याकडून शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 12, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
सरपंचांची मुदत संपली; प्रशासक आले, पाचोरा तालुक्यात कोणत्या ग्रामपंचायतीची जबाबदारी कोणाकडे?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 12 सप्टेंबर: पाचोरा तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेता न आलेल्या ग्रामपंचायतींच्या कारभारासाठी आता शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदींनुसार याबाबत नुकतेच आदेश जारी केले आहेत.

गेल्या सहा महिन्यांपासून काही ग्रामपंचायतींचा कारभार प्रभारी प्रशासक म्हणून सरपंचांकडे सोपविण्यात आला होता. या नियुक्तीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींवर आता शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठीही संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती आदेशाद्वारे करण्यात आली आहे.

आदेशानुसार, प्रशासकांना सरपंचांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ३५ (३) नुसार प्राप्त असलेले अधिकार व कर्तव्ये बजावता येणार आहेत. तसेच ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार, लेखे, लेखापरीक्षण, कर आकारणी आणि करवसुली याबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतींची कर आकारणी प्रलंबित असल्यास नियमानुसार फेरआकारणी करणे, करवसुलीचे प्रमाण वाढविणे, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नातून केवळ अत्यावश्यक बाबींवर खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीला प्राप्त होणारी वसुलीची रक्कम प्रथम बँकेत जमा करून खर्चाची अदायगी धनादेश अथवा बँकिंग प्रणालीद्वारे करण्याचेही आदेशात नमूद आहे.

पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायतीनिहाय नियुक्त प्रशासक :

दरम्यान, संबंधित ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होऊन विधीग्राह्यरीत्या गठीत ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यानंतर त्या दिवसापासून प्रशासकाचे पद आणि त्यांना प्रदान करण्यात आलेले अधिकार तात्काळ संपुष्टात येणार आहेत. प्रशासकांची नियुक्ती अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांसाठी किंवा ग्रामपंचायत स्थापनेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत, यापैकी जे आधी होईल तोपर्यंत राहणार आहे.

हेही वाचा: पाचोरा तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई! फोर्टीफाइड तांदूळासह 78 लाख 63 हजार रुपयांचा संशयास्पद साठा जप्त

बातमी शेअर करा !
Share
Tags: administrators for gram panchayatsgovernment officialsjalgaon zp ceo karishma nairpachora taluka newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

किनगावमध्ये मुख्य मार्गावरील कोणत्याही धार्मिक मिरवणुका रोखता कामा नयेत – भाजप नेते किरीट सोमय्या

October 27, 2026
दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

दुष्काळात पाणी, वीज, चारा व पीकविम्याच्या प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश

October 27, 2026
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

October 26, 2026
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस भेट; टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे अधिकाधिक रोपांची निर्मिती करण्याच्या सूचना

October 24, 2026
मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

मुंबईत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची आढावा बैठक संपन्न; जळगाव जिल्ह्यात ‘गाव तेथे शाखा’ अभियान राबविणार

October 24, 2026
 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

 दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्या विविध उपाययोजना

October 24, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page