जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय असून लोकांच्या समस्येचे वेळेत निवारण झाले पाहिजे यासाठी काम करणार असून स्वच्छता तसेच महिलांसाठी विशेष धोरण राबवणार असल्याचे आयएएस अधिकारी मिनल करनवाल यांनी सांगितले. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आयएएस अधिकारी मिनल करनवाल यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी पदभार स्विकारला. या निमित्ताने सुवर्ण खान्देश लाईव्ह न्यूजने त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आगामी काळातील जिल्हा परिषदेचे धोरण काय असेल याबाबत महत्त्वाची माहिती दिली. तसेच तरुणांना मोलाचा सल्ला दिला.